चौघांना मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:10 IST2021-05-11T04:10:20+5:302021-05-11T04:10:20+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : जाधववाडी येथे सुभाष सोपान जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये त्यांची पत्नी साधना व मुलगी प्रतीक्षा ...

Four beaten up, six charged | चौघांना मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

चौघांना मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : जाधववाडी येथे सुभाष सोपान जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये त्यांची पत्नी साधना व मुलगी प्रतीक्षा बाजरी पिकांचे राखण करत होती. त्या वेळी विमल विजय भोर (रा. जाधववाडी) ही त्या ठिकाणी आली व सदर जमीन माझे भाऊ विलास सहादू शिंदे यांची असून तुम्ही बाजरीचे पिकाचे राखण करायचे नाही असे म्हणाली. त्या कारणावरून विलास महादू शिंदे,कैलास सहादू शिंदे,वैशाली विलास शिंदे,सुनीता कैलास शिंदे ,धनेश विलास शिंदे,विमल विजय भोर (सर्व रा.जाधववाडी) यांनी साधना व प्रतीक्षा यांच्या डाव्या हातावर काठीने मारहाण केली.त्यावेळी सुभाष जाधव आणि मुलगा गणेश भांडणे सोडविण्यासाठी गेले असता संबधितांनी डाव्या हातावर काठीने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.याबाबत सुभाष सोपान जाधव (वय ४८, रा.जाधववाडी) यांनी संबधित सहा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान अजित मडके करत आहे.

Web Title: Four beaten up, six charged