खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक
By Admin | Updated: January 1, 2015 01:06 IST2015-01-01T01:06:17+5:302015-01-01T01:06:17+5:30
शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत १५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक
पुुणे : शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत १५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दीपक देवराम देवकुळे (वय ३४, रा. मंगळवार पेठ), असलान हनीफ तांबोळी (वय १८, रा. रविवार पेठ), सागर श्रीकांत पवार (वय १९, रा. सदानंदनगर, सोमवार पेठ) आणि रूपेश राजाभाऊ मोरे (वय २३, रा. शुक्रवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुनील बिरबलराम शर्मा (वय ३५, रा. बिबवेवाडी, मूळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. गाड्या घेण्यासाठी दीपक देवकुळे याने फिर्यादी यांच्या कंपनीकडून कर्ज घेतले आहे. त्याच्यासह प्रफुल्ल देवकुळे आणि अन्य ४-५ जणांनी फिर्यादी यांच्या कार्यालयात जाऊन गाडीचे हप्ते भरणार नसल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे गाडीच्या ना-हरकत पत्राची मागणी करत आणि शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सोबत आणलेल्या लोकांचा खर्च म्हणून त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आणि आरोपींच्या अन्य साथीदारांचा तपास करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीची सरकारी वकील अनिल कुंभार यांनी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.