पीएमपी चालकाच्या खूनाप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:12+5:302021-07-14T04:14:12+5:30

गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे (वय २९, रा.पापडेवस्ती, दशरथ नगर, फुरसुंगी, ता. हवेली) या पीएमपी चालकाचा खुन करण्यात ...

Four arrested in PMP driver murder case | पीएमपी चालकाच्या खूनाप्रकरणी चौघांना अटक

पीएमपी चालकाच्या खूनाप्रकरणी चौघांना अटक

गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे (वय २९, रा.पापडेवस्ती, दशरथ नगर, फुरसुंगी, ता. हवेली) या पीएमपी चालकाचा खुन करण्यात आला होता. याप्रकरणी ऋषिकेश संजय बोरगावे (वय ३१, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराई नगर, फुरसुंगी), अक्षय हनुमंत जाधव (वय २१, रा. साईसदन सोसायटी, आयबीएम समोर, फुरसुंगी, हडपसर), प्रज्वल सचिन जाधव (वय २०, रा . बिजलीनगर सोसायटी, काळेपडळ, हडपसर), तुषार सुर्यकांत जगताप (वय २१, रा. गाडीतळ, हडपसर) या चौघांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि ११) लोणी काळभोर पोलीस खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याचा समांतर तपास गुन्हे शाखा, युनिट ६ करत होते. आरोपी खून करून पळून गेले होते. हा गुन्हा उघडकीस करण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते.

पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, नितीन शिंदे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश टिळेकर व शेखर काटे यांनी साळुंखे हे नोकरीवरुन सुटल्यानंतरचे त्याचे हडपसर भागातील खाजगी सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्रतिक लाहिगुडे यांनी त्यांचे निरिक्षण केले. हा गुन्हा ऋषिकेश बोरगावे व अक्षय जाधव यांनी केला असून ते उमरगा, जि. उस्मानाबाद येथे पळून गेले आहेत अशी खात्रीशीर बातमी बातमीदारांकडून पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने उमरगा येथे जाऊन पूणे हैद्राबाद रस्त्यावरील लॉज तपासले. तेथे ऋषिकेश बोरगावे, अक्षय जाधव हे आंबिका लॉज, उमरगा येथे सापडले. त्यांनी त्यांचे साथीदार आकाश राठोड, प्रज्वल जाधव व तुषार जगताप यांच्या मदतीने गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे यांचा खुन केल्याचे कबूल केले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या मदतीने प्रज्वल जाधव, तुषार जगताप यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Four arrested in PMP driver murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.