फसवणुकीच्या गुन्ह्यात चौघांना अटक
By Admin | Updated: February 13, 2017 02:01 IST2017-02-13T02:01:15+5:302017-02-13T02:01:15+5:30
सराफी दुकानात काम करीत असताना ३० किलो चांदीच्या वस्तूचा अपहार करून फरार झालेल्या चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली

फसवणुकीच्या गुन्ह्यात चौघांना अटक
पुणे : सराफी दुकानात काम करीत असताना ३० किलो चांदीच्या वस्तूचा अपहार करून फरार झालेल्या चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १२ किलो चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत़
पुरणसिंग देवल (रा़ नरसाना, जि़ जालोर, राजस्थान), हरिसिंग तंवर (रा़ महोबतनगर, जि़ सिरोही, राजस्थान), महेंद्र सुतार (रा़ भरुडी, जि़ जालोर, राजस्थान) आणि देविसिंग तंवर (रा़ महोबतनगर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
याप्रकरणी इंदरमल गांधी यांनी फिर्याद दिली होती़ गांधींचे नाकोडा सिल्व्हर अँड गोल्ड आभूषण या नावाने रविवार पेठेत दुकान आहे़ त्यांच्याकडे देवल, तंवर आणि सुतार हे कामगार कामाला होते़ दोन वर्षांपासून नोव्हेंबर २०१६पर्यंत त्यांना गांधी यांनी विक्रीसाठी चांदीच्या वस्तू दिल्या होत्या़ त्यातील २५ ते ३० किलोच्या चांदीच्या वस्तंूचा त्यांनी अपहार केल्याचे निष्पन्न झाले़ फरासखाना पोलिसांनी राजस्थानला जाऊन प्रथम महेंद्र सुतारला ताब्यात
घेतले़
त्याच्याकडील माहितीवरून वाकड येथे असलेल्या पुरणसिंग देवल याला पकडले़ त्याच्याकडील १० किलो चांदीच्या वस्तू जप्त केल्या़ हरिसिंग तंवर याच्याकडून २ किलो चांदीच्या वस्तू जप्त केल्या़ फरासखाना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अबुजर चाऊस व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली़
(प्रतिनिधी)