शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

500 रुपयांची वर्गणी न दिल्याने मोटारसायकल जाळणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 09:39 IST

पाचशे रुपये वर्गणी न दिल्याने आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाची मोटारसायकल पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पुणे : पाचशे रुपये वर्गणी न दिल्याने आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाची मोटारसायकल पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी (2 सप्टेंबर) पहाटे चार जणांना अटक केली आहे. दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. 

याप्रकरणी प्रफुल चंद्रकांत थोरात (वय २० वर्ष) यानं फिर्याद दिली होती. प्रफुलचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. या चौघांनी त्यांच्याकडे दहीहंडीची पाचशे रुपये वर्गणी मागितली होती. पण, इतकी वर्गणी देणे आपल्याला शक्य नसल्याचे सांगितले. थोरातनं इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये आपली मोटारसायकल पार्क केली होती.  मागितलेली वर्गणी न दिल्याने रागावून त्या चौघांनी १ सप्टेंबरच्या मध्यरात्री  इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये थोरात यांनी लावलेल्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढले व ते मोटासायकलवर टाकून ती पेटवून दिली. या आगीत मोटारसायकलबरोबरच इमारतींचा पार्किंग स्लॅबलाही आग लागली होती.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, सहायक पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक खानविलकर, सहायक फौजदार शिंदे, फडतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने या चौघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आज पहाटे चौघांनाही अटक करण्यात आली आहे. वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास कारवाईनागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहात साजरे करावे. मात्र, ते करताना कोणीही वर्गणीसाठी नागरिकांवर जबरदस्ती करु नये. जर असे कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे.हडपसर येथे वर्गणी मागण्यावरुन नुकताच गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी हा इशारा दिला आहे.  असे असतानाही शहरात वर्गणीसाठी जबरदस्ती केल्याच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी