खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:10 IST2021-05-26T04:10:32+5:302021-05-26T04:10:32+5:30

पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ...

Four arrested for attempted murder | खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना अटक

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना अटक

पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जिलानी सलीम शेख (वय २९), मुनीर गौश शेख (वय ३३), नझीर समील शेख (वय २७) आणि इरफान आकील पटेल (वय २७, सर्व रा. भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या बाबत योगेश मारुती गायकवाड (वय २५, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. २२ मे रोजी भवानी पेठेतील विशाल तरुण मंडळासमोर हा प्रकार घडला. फिर्यादी आणि आरोपी एकाच वस्तीत राहायला आहेत. शनिवारी फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह घटनास्थळी थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले, अशी फिर्याद देण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अॅड. ज्ञानेश्वर मोरे यांनी केले.

------------------------------------

Web Title: Four arrested for attempted murder