शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याला गंडा घालणाऱ्यांना हरियाणातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 21:27 IST

आयुर्विमा पॉलीसीत गुंतवणूक करण्याच्या आमिषाने एका अभियंत्याला १ कोटी ८५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांना पोलिसांनी हरियाणा येथील फरिदाबादमधून अटक केली आहे़.

पुणे : आयुर्विमा पॉलीसीत गुंतवणूक करण्याच्या आमिषाने एका अभियंत्याला १ कोटी ८५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांना पोलिसांनी हरियाणा येथील फरिदाबादमधून अटक केली आहे़. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, क्रेडिट कार्ड असा माल जप्त केला आहे़     प्रमोद भगतसिंग राणा (वय २९), दिनेशकुमार रामकुमार गाढरी (वय २६), राहुल राजपाल सिसोदिया (वय २३), अमनदिप सरमतसिंग बैसला (वय २६, चौघे रा. दिल्ली)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़, ते हरियानामधील फरिदाबाद येथे कॉलसेंटर चालवित होते़. याप्रकरणी सुनिल चिंतामणराव नंदनकर (वय ५५,रा. संपन्न होम्स, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. नंदनकर हे मनमाड येथील आॅईल कंपनीत व्यवस्थापक आहेत़ त्यांच्या पॉलिसीची मुदत संपली असल्याची बतावणी आरोपींनी २०१३ मध्ये नंदनवार यांच्याकडे केली होती. नवीन पॉलिसीत गुंतवणूक करा.चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन ते नंदनकर यांच्याशी  गेले ५ वर्षे  संपर्कात होते़ वेळोवेळी नंदनकर यांना वेगवेगळ्या बँकेत १ कोटी ८५ लाख रुपये भरण्यास सांगितले होते.     नंदनकर यांनी रक्कम बँक खात्यात जमा केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडून टाकला होता़ त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. हडपसर पोलिसांच्या बरोबरीने सायबर क्राईम सेल समांतर तपास करीत होती़.तांत्रिक तपासात आरोपींनी फसवणूक करण्यासाठी वापरलेली बँक खाती उत्तरप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले होते. तपासात आरोपींचा वावर दिल्ली, हरियाणा, नोएडा भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीस व सायबर सेलच्या पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना झाले. हरियाणातील फरिदाबाद शहरात आरोपी चालवित असलेल्या कॉलसेंटरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेण्यात आले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, विश्वजीत खुळे, उपनिरीक्षक राहुल घुगे, शंकर नेवसे, अनिल वनवे, किरण अब्दागिरे, अमित औचरे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाfraudधोकेबाजीHaryanaहरयाणा