शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

विश्रांतवाडीतील तरुणाच्या खूनाप्रकरणी चार आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 21:11 IST

पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली..

येरवडा: विश्रांतवाडी येथे बुधवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला होता. तुषार जयवंत भोसले (वय २३, रा. दांडेकर पूल,  दत्तवाडी) याचा खून केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी बाळू अर्जुन शिंदे (वय ४२), फ्रांसिस स्वामी उर्फ भैय्या अँथनी स्वामी (वय २०, दोघेही रा. सन. ११२, विश्रांतवाडी), सरफराज सलीम शेख उर्फ गोल्या (वय २०, रा. विठ्ठल मंदिर मागे धानोरी), अकबर शहाबुद्दीन शेख(वय २२, रा. भिमनगर, विश्रांतवाडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार याचे फ्रान्सेस स्वामी उर्फ भैय्या याच्यासोबत पूर्वी काही कारणावरून वाद झाले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुषार वडारवस्ती येथे आला होता. याठिकाणी तुषार व भैय्या यांच्यात पुन्हा शिवीगाळ वादावादी झाली. त्यानंतर तुषार याने त्याच्या पत्राचाळ विश्रांतवाडी व जनता वसाहत दत्तवाडी येथील साथीदारांना विश्रांतवाडी येथील वडार वस्तीत बोलावून घेतले. येथे आल्यानंतर ते भैय्या याचा वस्तीत शोध घेऊ लागले. भैय्या याचा मित्र बाळू शिंदे यांच्या घरात गेल्यानंतर बाळूने तुषार याला हातातील चाकुने पोटात व छातीत वार केले. तर त्याचे इतर साथीदार भैय्या, सरफराज व अकबर यांनी लाकडी बांबू रोड व सत्तुर घेऊन पाठलाग करत मारहाण व दगडफेक करण्यास सुरुवात केली.

बाळू याने तुषार याच्यावर चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी झाला. तुषार याचा भाऊ आदित्य व त्याच्या इतर साथीदारांनी त्याला आधी खासगी रुग्णालयात व नंतर ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणी पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तुषार भोसले याच्या खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौघा आरोपींना तात्काळ अटक केली आहे

अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते, हवालदार दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, पोलीस नाईक संपत भोसले, संजय बादरे, पोलीस शिपाई संदीप देवकाते, प्रफ्फुल मोरे, शेखर खराडे यांच्या पथकाने खुनातील आरोपींना तात्काळ अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी