सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘पीएमपी’साठी फोरम
By Admin | Updated: December 29, 2014 00:54 IST2014-12-29T00:54:52+5:302014-12-29T00:54:52+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) कारभार सुधारण्यासाठी शासनाने डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी दिला

सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘पीएमपी’साठी फोरम
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) कारभार सुधारण्यासाठी शासनाने डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी दिला आहे. त्यांच्या मदतीला पीएमपीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा फोरम राहणार आहे.
महापालिकेचे नगरसेवक व लोकप्रतिनिधीच्या आग्रहाने अनेक ठिकाणी बससेवा सुरू करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सासवड, उरळीकांचन व नसरापूरपर्यंत पीएमपीची बस जाते.
त्याठिकाणी अनेकदा बसला प्रवासी मिळत नाहीत. तरीही तोट्यात बस चालविल्या जात आहेत. मात्र, सासवड, आळंदी व तळेगाव येथे नगरपालिका असून, त्यांच्याकडून पीएमपीसाठी कोणतीही मदत केली जात नाही. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पीएमपीचा तोटा भरून काढणे. या सर्व गोष्टी करताना कामगारांच्या वेतनातील फरकांच्या रकमेचा वापर केला जावू नये. कामगारांना वेळेवर वेतन मिळाल्यास त्यांची साथ मिळणार आहे. त्यामुळेच पीएमटी कामगार संघ इंटकने डॉ. परदेशी यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)