शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दैवबलवत्तर... म्हणून अनर्थ टळला ....! एसटीच्या सुरक्षित प्रवासाला ‘ खो’ देणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 20:12 IST

प्रवाशांच्या सेवेचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाने गाड्यांच्या सुरक्षेविषयी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे. हे या प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .चालकाला चष्मा असल्यामुळे मोठी दुर्घटना होता होता राहिली  

ठळक मुद्देचालू प्रवासातच सासवड सूप बसच्या चालका समोरील काच अचानक फुटली , सुदैवाने जीवितहानी नाही

सासवड : चालकाच्या समोरील काच अचानक फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या. चालू वाहनातच हा प्रकार घडला. तथापि चालकाला चष्मा असल्यामुळे त्याला कोणतीही इजा झाली नाही आणि बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सासवड आगाराच्या सासवड -सुपा या बसचा हा अपघात या मार्गावरील तक्रारवाडीच्या जवळ आज (शनिवार २१ जुलै ) रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान घडला.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड डेपोची सकाळची सव्वानऊची सुपा बस (क्रमांक एमएच १२ ई एफ ६२५९)  नेहमीप्रमाणे चालक सुभाष सातव व वाहक रामचंद्र गावडे घेऊन मार्गस्थ झाले .१५ प्रवाशांसह बसचा प्रवास सुरु असताना तक्रारवाडीनजीक आल्यावर अचानक चालकाच्या समोरची काच फुटून सर्व काचा केबिनमध्ये उडाल्या . काही काचा वाहकाच्या जवळ आल्या . अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशी घाबरून गेले. परंतु सातव यांच्या डोळयांवर चष्मा असल्याने त्यांना दुखापत झाली नाही.त्याही स्थितीत बस पिसर्वेपर्यंत आणली . विशेष बाब म्हणजे चालकाच्या समोरची काच ही नेहमीच्या प्रकारातील नसल्याचे दिसून आले. प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाने गाड्यांच्या सुरक्षेविषयी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे हे या प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .चालकाचा चष्मा नसता तर मोठी दुर्घटना घडली असती . 

टॅग्स :Purandarपुरंदरpassengerप्रवासीAccidentअपघात