शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सिंहगडाच्या घाट रस्त्यावर लोखंडी जाळी बसविणार; वन विभागाकडून दीड कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 11:42 IST

पावसाळा संपल्यानंतर लगेच हे काम सुरू करण्यात येणार

पुणे : किल्ले सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरड कोसळून काही अपघात होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरक्षक लोखंडी जाळी लावण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाने दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेच हे काम सुरू करण्यात येणार आहे.

घाट रस्त्याने किल्ले सिंहगडावर जाताना अचानक दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेकदा रस्ता बंद होऊन वाहतूक कोंडी होते. तसेच कोणी दुचाकीस्वार किंवा चार चाकी घाट रस्त्याने जात असेल तर त्यांच्यावरही ही दरड कोसळू शकते. त्यामुळे ही गोष्ट विचारात घेऊन वन विभागाने तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याला संपूर्ण घाट रस्त्याला लोखंडी संरक्षक जाळी लावावी, अशी विनंती केली आहे. त्यासाठी त्यांनी निधीही दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने यासाठी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली असून, चार ठिकाणी संरक्षक कठडे उभे केले आहेत. इतर संपूर्ण रस्त्यावर लवकरच काम सुरू होणार आहे. आता पावसाळा असल्याने ते काम करता येत नाही. म्हणून पावसाळ्यानंतर काम सुरू होण्याची शक्यता आहे.घाट रस्त्यात कुठे धोकादायक वळण आहे, त्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. रस्त्याच्या कडेला वाहने थांबवू नयेत, असे वन विभागातर्फे सर्वांना सांगण्यात येते.

''सिंहगड घाट रस्त्याने जाताना कोणालाही इजा होऊ नये म्हणून लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याची आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती केली आहे. त्यासाठी त्यांना निधीदेखील दिला आहे. काम सुरू करण्याविषयी बांधकाम विभाग कार्यवाही करणार आहे. - प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग'' 

''घाट रस्त्यावर संरक्षक जाळी बसविणार आहेत, ती चांगली गोष्ट आहे. पण दर शनिवार-रविवार सिंहगडावर जाताना घाट रस्त्यावर प्रचंड गर्दी होते. त्यावर योग्य उपाय करावा. वाहतूक नियोजन करणारे कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे. सिंहगडावर जाण्यासाठी प्रवेश शुल्क घेण्यात येते. तो लाखो रुपये असतो. त्यातून योग्य त्या सुविधा दिल्या पाहिजेत. - रोहन कुलकर्णी, सिंहगडावर नियमित जाणारा तरुण'' 

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाroad safetyरस्ते सुरक्षाforest departmentवनविभागSocialसामाजिकFortगड