शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 15:32 IST

व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड आणि जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित केले होते.

पुणे : नागालँडचे माजी मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्रालयाचे माजी सचिव अच्युत माधव गोखले (वय ७५) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड आणि जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित केले होते.गोखले यांचा जन्म ३ जानेवारी १९४६ रोजी झाला. १९६५ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयामध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ नौदलामध्ये काम केले. त्यानंतर ते नागालँड केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रूजू झाले. विविध पदांवर काम करताना गोखले यांनी नागालँड येथे ग्रामीण विकासामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. नागालँड एम्पॉवरमेंट ऑफ पिपल थ्रू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (एनईपीईडी) योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये गोखले यांना यश आले. १९८७ ते १९९२ या कालावधीमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून काम करताना त्यांनी जवाहर रोजगार योजना यशस्वीपणे राबविली होती.

१९९२ मध्ये ते पुन्हा नागालँडमध्ये परतले. कृषी आयुक्त आणि राज्याचेमुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्रालयाचे सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.नागालँडमध्ये असताना गोखले यांनी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला होता. तेथील वनस्पतींची छायाचित्रे त्यांनी टिपली होती. या छायाचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकांमध्ये पुस्तकांचा जगभरामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला जातो.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या