शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी २०१८च्या परीक्षेतही गैरव्यवहार, राज्य परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव डेरेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 09:59 IST

TET Exam Papers : जी ए सॉफ्टवेअरचा बंगळुरूचा तत्कालीन संचालक अश्विनकुमारही जाळ्यात.

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण दिवसेंदिवस वाढत असून आता ते २०१८ च्या परीक्षेपर्यंत पोहचले आहे. २०१८ मध्ये राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेला व माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचा विभागीय आयुक्त सुखदेव डेरे याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा पेपर गैरव्यवहार प्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या ५ झाली आहे. 

सुखदेव डेरे हा २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेचा आयुक्त होता. २०१८ च्या टीईटी पेपर फोडण्यामध्ये डेरे याचाही हात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. डॉ. प्रीशीत देशमुख याच्या अगोदर जी ए सॉफ्टवेअरच्या महाराष्ट्राची जबाबदारी अश्विनकुमार याच्याकडे होती. त्याच्याशी संगनमत करुन डेरे व तुकाराम सुपे यांनी परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेऊन त्यांना पास केल्याचे माहिती समोर आली आहे.

यावरुन जी. ए. सॉफ्टवेअरमध्ये प्रीतीश देशमुख याच्या अगोदरही तेथील संचालक हे वरिष्ठांशी संगनमत साधून परीक्षेमध्ये गैरव्यवहार करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी २०१६ पासून झालेल्या सर्व टीईटी परीक्षांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच हा प्रकार समोर आला.

टॅग्स :examपरीक्षाPuneपुणे