शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मंगलदास बांदल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, फसवणुक गुन्ह्याच्या तपासासाठी आता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 12:05 IST

बांदल यांचे मित्र मांढरे आणि बँकेचे माजी संचालक दौंडकर या तिघांनाही एक जूनपर्यंत होती न्यायालयीन कोठडी

ठळक मुद्देतिघांचीही पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

शिक्रापूर: पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांना (ता. २ जून) शिरुरन्यायालयाने दत्तात्रेय मांढरे फसवणूक प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, त्याचवेळी शिक्रापूर पोलिसांनी त्यांना पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या एका फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पुन्हा अटक केली.

दरम्यान, बांदल यांचे मित्र असलेले दत्तात्रेय मांढरे यांच्या व्यवहारातील दस्त कुलमुख्त्यारपत्रावरही आणखी दोघांना अडकवल्याचा प्रकार उघड झाला आहे.  बांदलांबरोबर अनेक दिवस मैत्री असलेले घोडगंगा सहकारी बॅंकेचे माजी संचालक रामहरी दौंडकर (रा. करंजावणे, ता. शिरूर) यांनाही अटक झाली. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. 

सणसवाडी (ता. शिरूर) येथील पाणीचोरीच्या गुन्ह्यात मंजूर अटकपूर्व जामीन मिळताच दत्तात्रेय मांढरे यांची बनावट दस्तऐवज व शिवाजीराव भोसले सहकरी बॅंकेच्या थकीत सव्वा कोटीच्या कर्जाच्या अनुषंगाने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात त्यांना २६ मे रोजी अटक केली होती.  न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. 

दरम्यान एक दिवस आधीच म्हणजे ३१ मेला मांढरे यांच्याच प्रकरणातील व्यवहारात केलेले कुलमुख्त्यारपत्रात बांदल यांनी मांढरें ऐवजी रामहरी दौंडकर व एस. जे. सातपुते यांना मांढरे म्हणून उभे केल्याचे पुढे आले. त्याच रात्री दौंडकर व सातपुते यांना अटक करण्यात आली आणि १ तारखेला न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या तिघांचीही पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

याच वेळी शिक्रापूर पोलिसांनी बांदलांचा पुन्हा ताबा हवाय; म्हणून न्यायालयात अर्ज केला. कारण २२ मार्च रोजी मंदार पवार (रा. तळेगाव ढमढेरे) यांच्या तक्रारीनुसार शिक्रापुरातील कृष्णाजी ज्ञानोबा विरोळे यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतून काढलेल्या १ कोटी ७५ लाखांच्या कर्जासाठी पवार यांचे बोगस पॅनकार्ड, आधारकार्ड, प्राप्तीकरण विवरण पत्र वापरले होते. त्यात विरोळे यांच्यावर गुन्हा दाखल असून ते फरारी आहेत. भोसले सहकारी बॅंकेनेच मंदार पवार यांच्या प्रकरणातही बांदल यांचा सहभाग असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिसांकडे मंगळवारी (ता.१ जून) दाखल केल्याने बांदल यांना या नवीन फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी शिक्रापूर पोलिसांनी आज शिरूर न्यायालयातूनच ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरCourtन्यायालय