शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नीला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 14:48 IST

मेव्हुण्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण   

ठळक मुद्देन्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर सुटका

पुणे : भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना आज सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली. मेव्हुण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तसेच आज त्यांच्या विरोधात दोषारोपत्रही दाखल करण्यात आले.

युवराज ढमाले (वय, ४०) यांनी याबाबत काकडे यांच्याविरूध्द फिर्याद दिली आहे. ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी ढमाले यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे २०१० पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात. ऑगस्ट २०१८ मध्ये फिर्यादी ढमाले हे संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी त्यांना, तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी आज सकाळी काकडे दाम्पत्याला अटक करून पोलिस बंदोबस्तात  न्यायालयात हजर केले.त्याचबरोबर ढमाले यांनी फिर्याद दिल्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्रदेखील शेवाळे यांनी न्यायालयात दाखल केले. काकडे दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आली होती. मात्र बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. ढमाले यांच्यावतीने ॲड. विजयसिंग ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. .........जामिनाच्या अटी व शर्ती

- पोलिस बोलवतील तेव्हा पोलिस ठाण्यात हजर व्हायचे- तपासात पोलिसांना सहकार्य करायचे- न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जायचे नाही- साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही- पत्ता व ओळखपत्राची कागदपत्रे न्यायालयात सादर करावेत

.....................................

"हा कौटुंबिक वाद आहे..'': संजय काकडे दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझे व पत्नीचे साधे बोलणे देखील झालेले नसताना मग आत्ताच हे आरोप का केले याचे आश्चर्य वाटत आहे. आता याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आज न्यायालयात प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. "हा कौटुंबिक वाद आहे. आणि या प्रकरणी आम्ही न्यायालयाची प्रक्रिया पाळत आहोत." - संजय काकडे, माजी खासदार

टॅग्स :PuneपुणेSanjay Kakdeसंजय काकडेArrestअटकPoliceपोलिसCourtन्यायालय