माजी आमदार संपतराव जेधे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST2020-12-17T04:37:15+5:302020-12-17T04:37:15+5:30
आंबवडे ग्रामपंचायतीचे सरपंच पदापासून राजकीय जीवनास सुरुवात केलेल्या संपतराव जेधे यांनी भोर तालुका पंचायत समितीचे सभापती पदही भूषविले होते.ते ...

माजी आमदार संपतराव जेधे यांचे निधन
आंबवडे ग्रामपंचायतीचे सरपंच पदापासून राजकीय जीवनास सुरुवात केलेल्या संपतराव जेधे यांनी भोर तालुका पंचायत समितीचे सभापती पदही भूषविले होते.ते सन १९७८ मध्ये भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. ते पंढरपुर देवस्थान मंदिराचे शासकिय ट्रस्टचे सलग १० वर्ष विश्वस्थ होते तर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
येथील भोर एज्युकेशन सोसायटीचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. त्यांनी रायरेश्वर दिंडीची ४० वर्षांपूर्वी स्थापना केली होती ते या दिंडीने भोर ते पंढरपुर आणि आळंदी पर्यंतच्या पायी वारीत सहभागी होत असत. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व लोकनेते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ते परिचीत होते.
१६ भोर