राजगुरूनगर : विशेष तपास पथकाने (एस आय टी) चाकण हिंसाचार प्रकरणी ठपका ठेवलेले आणि या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. चाकण मराठा आरक्षण मोर्चास हिंसक वळण लागले होते. गतवर्षी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता. याबाबत अटकपूर्व जामीन अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश रेवती ढेरे यांच्या न्यायालयात याबाबत दिलीप मोहिते पाटील यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. अॅड. मनोज मोहिते व अॅड. तपन थत्ते यांनी युक्तिवाद केल्याचे मोहिते पाटील यांच्या निकटवरतीयांनी सांगितले. एक व दोन ऑगस्टला पोलीस ठाण्यात जबाब देण्याचे मोहिते यांना सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी २१ऑगस्टला होणार असल्याचे मोहिते निकटवरतीयांनी सांगितले. त्यामुळे मोहिते पाटील यांना सध्या दिलासा मिळाला आहे.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयात मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 16:51 IST
गतवर्षी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयात मंजूर
ठळक मुद्देचाकण हिंसाचार प्रकरणी ठपका