शहरं
Join us  
Trending Stories
1
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
4
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
5
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
6
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
8
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
9
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
10
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
11
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
12
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
13
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
14
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
15
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
16
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
17
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
18
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
19
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
20
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे माजी संपादकीय संचालक निर्मलकुमार दर्डा कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 10:04 IST

वितरण आणि वृत्तपत्र क्षेत्रातील भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या निर्मलबाबूंनी ‘लोकमत’चे जाळे महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली.

पुणे : लोकमत वृत्तपत्र समूहाचे माजी संपादकीय संचालक निर्मलकुमार खुशालचंद दर्डा उर्फ निर्मलबाबू (वय ७६) यांचे शनिवारी निधन झाले. वितरण आणि वृत्तपत्र क्षेत्रातील भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या निर्मलबाबूंनी ‘लोकमत’चे जाळे महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली.  ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. 

पुलगाव (जि. वर्धा) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, संचालक अशोक जैन, किशोर दर्डा यांच्यासह लोकमत परिवारातील अनेक सदस्य, मान्यवर नागरिक उपस्थित होते. निर्मल दर्डा अतिशय शिस्तप्रिय होते, गुणग्राहक होते आणि अविश्रांतपणे त्यांनी काम केले, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, डॉ. वसंत भोसले आणि मधुकर भावे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘लोकमत जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानितवाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांना कायद्याचा अभ्यास करायचा होता, परंतु बाबूजींच्या सल्ल्यानुसार ते ‘लोकमत’मध्ये व्यवस्थापक म्हणून सामील झाले. वितरण आणि व्यवस्थापनासोबत संपादकीय दृष्टिकोनही हवा, या जाणिवेतून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यव्यापी नेटवर्क तयार केले. राज्यात ‘लोकमत’च्या महत्त्वाच्या आवृत्त्या सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. वृत्तपत्रविश्वातील त्यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘लोकमत जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

‘लोकमत’च्या प्रारंभीच्या काळात निर्मलबाबू यांच्यासोबत रात्रंदिवस केलेले काम हा माझ्या आयुष्यातला अनमोल ठेवा आहे. माझ्या मनाशी त्यांच्या नावाचा दिवा अखंड तेवत राहील. डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत माध्यम समूह

विदर्भ, मराठवाडा, खान्देश या विभागात तर निर्मलबाबूंनी ‘लोकमत’च्या वितरणाचे जाळे भक्कम केलेच, शिवाय मुंबई आणि पुणे या आवृत्त्यांच्या यशातही त्यांचा वाटा सिंहाचा होता. राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत

पहिल्या अंकापासून प्रवास‘लोकमत’ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचावा, हे श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे हे निर्मलबाबू यांनी आपले ध्येय बनवले आणि ‘लोकमत’ वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. लोकमत समूहाचे चेअरमन डॉ.  विजय दर्डा आणि एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी तयार केलेल्या टीमचे ते खंदे शिलेदार होते. ‘लोकमत’च्या पहिल्या अंकापासून निर्मलबाबू यांचा प्रवास सुरू झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Former Lokmat Editorial Director Nirmalkumar Darda Passes Away

Web Summary : Nirmalkumar Darda, former Lokmat editorial director, passed away at 76. Known for his pivotal role in expanding Lokmat's reach across Maharashtra, he was honored with the Lokmat Jeevan Gaurav Puraskar for his contributions to the newspaper industry. His work was invaluable.
टॅग्स :LokmatलोकमतDeathमृत्यू