शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

काडेपेटी दिली नाही म्हणून माजी कॅप्टन बालींचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 20:53 IST

सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी दिली नाही, म्हणून झालेल्या वादावादीत माजी कर्नल रवींद्रकुमार बाली यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

पुणे : सिगारेट पेटविण्यासाठी काडेपेटी दिली नाही, म्हणून झालेल्या वादावादीत माजी कर्नल रवींद्रकुमार बाली यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. रॉबीन सन ऊर्फ रॉबीन अ‍ॅन्थोनी लाझरस (वय २१, रा. कलनल, तारापूर रोड, दस्तुर बॉईज हायस्कूलसमोर, कम्प) असे त्याचे नाव आहे. रॉबीनसन याच्याविरुद्ध यापूर्वी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.याबाबतची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक सीताराम मोरे यांनी दिली. भारतीय लष्करात कॅप्टन म्हणून सेवा केलेल्या आणि कौटुंबिक कारणामुळे कॅम्प भागातील पदपथावर दिवस काढण्याची वेळ आलेल्या रवींद्रकुमार बाली (वय ६५, रा. कोयाजी रोड) यांच्यावर १ फेब्रुवारीला रात्री पावणेबारा वाजता डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडील अधिकारी व कर्मचा-यांनी लष्कर भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता एक संशयित घटनास्थळापासून मंगलविहार, वंडरलँडच्या बोळातून, एम. जी. रोड व त्यानंतर टोराटोरा हॉटेलच्या शेजारील बोळातून नाज चौकातून, हॉटेल अरोरा टॉवर या ठिकाणाहून पळत जात असल्याचे निष्पन्न झाले. खून करणारा हाच संशयित असल्याची शक्यता धरून त्यानुसार तपास करीत असताना रॉबीनसन हा त्या दिवसापासून फरार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे यांना रॉबीनसन हा पनवेलमधील तळोजामधील पेंदर येथे असल्याचे समजले़ त्यानुसार रॉबीनसन याला पोलिसांनी पकडले. त्याने गुन्हा कबूल केला.रॉबीन व त्याचा मित्र कुणाल मोरे हे त्या दिवशी संध्याकाळी केदारी पेट्रोल पंपाजवळून दारू घेऊन ओल्ड नाईन्टी नाईनजवळील टेकडीवर दारू पित बसले होते. तेव्हा त्यांचा मित्र अक्षय कांबळे, तेजस मोरे, राज कांबळे असे तिघे तेथे आले. त्यांनी दारू पिऊन झाल्यावर घरी जाण्यासाठी निघाले असता रॉबीनची गाडी बंद पडली म्हणून कुणाल मोरे याने त्याचा भाऊ तेजस मोरे याला त्याची गाडी घेऊन बोलावले. त्याप्रमाणे तेजस आला. तेजसच्या गाडीवर तिघे जण व कुणाल मोरे व राबीन यांच्या गाडीवरुन महंमदवाडी येथून निघून रॉबीनच्या घरी येत होते. रात्री साडेअकरा वाजता मंमादेवी चौकात पेट्रोल संपल्याने गाडी बंद पडली. गाडीस कुणाल हा धक्का मारत व रॉबीन मागून चालत घराकडे जात होते. त्यावेळेस रॉबीन याला सिगारेट ओढायची होती. त्याने कोयाजी रोडवर तंबूत झोपलेल्या रवींद्रकुमार बाली यांनी उठविले व त्यांच्याकडे काडेपेटी पाहिजे, असे सांगितले. बाली यांनी काडेपेटी दिली नाही़ तेव्हा त्यांच्या झटापट होऊन मारामारी झाली. त्या भांडणामध्ये रॉबीन याने रस्त्याचे जवळच असणारा सिमेंटचा ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात दोन तीन वेळा मारला, ते जागेवरच कोसळले. तेव्हा कुणाल मोरे याने रॉबीनला पथ्तर से मत मारो, झगडा मत करो, लफडा हो जाएगा असे म्हणून कुणाल गाडी घेऊन सरळ पळत गेला. त्यानंतर रॉबीनही तेथून पळून गेला. त्याने कोणीही ओळखू नये म्हणून महंमदवाडी येथे स्वत:चे केस कापून केश रचना बदलली. मित्रांकडून स्वत:च्या घरातील कपडे आणून कोणास काही कळू नये, म्हणून मुंबईला जाऊन तेथून तळोजा येथील पेंदर येथे चायनीज गाडीवर काम करु लागला होता.रॉबीन याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने काही दिवस एका कॉल सेंटरला काम केले होते. त्याच्या वडिलांची लिंबू पाण्याची गाडी असून आई दर तीन महिन्यांनी कामासाठी हॉगकॉगला जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, शकूर सय्यद, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, अतुल साठे, संदीप तळेकर, राजू रासगे, रोहिदास लवांडे, महेंद्र पवार, गजानन गाणबोटे, शिवानंद स्वामी, संदीप राठोड, कल्याणी आगलावे, गुणशिंलन रंगम, अनिल घाडगे, अनिल भोसले, कल्पेश बनसोडे यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणे