शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात 83 गट व 166 गणांची रचना; अधिसूचना जाहीर न झाल्याने संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 20:23 IST

अधिसूचना जाहीर न झाल्याने संभ्रम कायम

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : राज्य निवडणूक आयोग इलेक्शन मोडवर असून, महापालिकेनंतर आता दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या गट-गणांची प्रारुप रचना व नकाशे सादर करण्याच्या तोंडी सूचना जिल्हा प्रशासनाला दिली आहे. गेल्या दहा वर्षातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या गट-गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु या संदर्भातील अधिसूचना जाहीर न झाल्याने नक्की वाढीव 83 की कमी झालेल्या 73 नुसार गट-गण निश्चित होणार याबाबत संभ्रम कायम आहे. 

जिल्हा परिषद गटांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला, परंतु या निर्णयाची अधिसूचना अद्यापही काढण्यात आलेली नाही. राज्यात सद्यस्थितीत एका जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त 75 आणि कमीत कमी 50 गट आहेत. त्यामध्ये वाढ करून जास्तीत जास्त 85 आणि कमीत कमी 55 गट तयार करण्याचा निर्णय शासनचा आहे. परंतु अधिसूचना काढण्यात आली नसल्याने जुन्या-  नव्या निर्णया प्रमाणे गटांची संख्या निश्चित होणार याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. 

परंतु राज्य निवडणूक आयोगाने मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार 83 गट व 166 गण गृहीत धरून गट-गण प्रारूप रचना सादर करण्याच्या तोडी सूचना दिल्या. त्यानुसार प्रारुप रचना व नकाशे सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व प्रांत अधिका-यांना दिल्या आहेत. 

राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील निवडणुका घेण्यासाठी पात्र असलेल्या सुमारे तीनशे ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला दिलेली स्थगिती उठवली असून , या प्रभाग रचना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यामुळे महापालिके पाठोपाठ आता जिल्हा परिषद गट-गण रचनेला देखील वेग येणार हे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र