शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापायचे विसरले

By admin | Published: March 05, 2017 4:38 AM

इयत्ता बारावीच्या जनरल फाउंडेशन या विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत एक गुणांचा प्रश्न छापण्याचे राहून गेल्याचे समोर आले आहे. मराठी माध्यमाच्या

पुणे : इयत्ता बारावीच्या जनरल फाउंडेशन या विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत एक गुणांचा प्रश्न छापण्याचे राहून गेल्याचे समोर आले आहे. मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत मात्र हा प्रश्न छापण्यात आलेला आहे. दरम्यान, याबाबत समन्वय समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले.‘एमसीव्हीसी’चा ‘जनरल फाउंडेशन कोर्स पेपर २ ची ४० गुणांची परीक्षा शनिवारी झाली. या विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नक्रमांक १ (अ) मध्ये चार गुणांचा ‘रिकाम्या जागा भरा’ असा प्रश्न होता. त्यात प्रत्येकी एक गुण याप्रमाणे चार प्रश्न विचारणे अपेक्षित होते. मात्र तीनच प्रश्न छापण्यात आले आहेत. चौथा प्रश्नच नसल्याने विद्यार्थीही गोंधळून गेले. मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत मात्र चारही प्रश्न छापण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे एका गुणाचे नुकसान होण्याची भीती आहे. सिस्कॉम संस्थेचे राजेंद्र धारणकर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. ही गंभीर चूक असून राज्य मंडळाने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे धारणकर म्हणाले.दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. समन्वय समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पाटील म्हणाले.