सदासर्वकाळ स्थानिक इतिहासलेखन उपयुक्त: पांढरमिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:59+5:302021-04-04T04:09:59+5:30
येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या स्थानिक इतिहासलेखनाच्या ऑनलाइन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या ...

सदासर्वकाळ स्थानिक इतिहासलेखन उपयुक्त: पांढरमिसे
येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या स्थानिक इतिहासलेखनाच्या ऑनलाइन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेचे आयोजन इतिहास विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे होते. या प्रसंगी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे व्हाइस चेअरमन भाऊसाहेब ढमढेरे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी इतिहास विभागाच्या सा.प्रा.श्वेता ओहाळ ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, तर शेवटी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक सा.प्रा.अनिल सोनवणे यांनी आभार मानले. या कार्यशाळेचा लाभ शिक्षक, शिक्षकेतर यांच्यासह एकूण ५५ विद्यार्थी - विद्यार्थिनींनी घेतला.