शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: टेम्पो साेडविण्यासाठी लाच घेताना वनपरिमंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात

By विवेक भुसे | Updated: October 13, 2022 14:30 IST

प्रविण क्षीरसागर हा वन परिक्षेत्र अधिकारी शिरुर प्रादेशिक कायार्लयाच्या अंतर्गत नेमणुकीला...

पुणे : झाडे तोडून वाहतूक करताना पकडलेला टेम्पो सोडण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वन परिमंडळ अधिकाऱ्याला पकडले. प्रविण अर्जुन क्षीरसागर (वय ४०, रा. सावतामाळीनगर, शिरुर) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. क्षीरसागर हा वन परिक्षेत्र अधिकारी शिरुर प्रादेशिक कायार्लयाच्या अंतर्गत नेमणुकीला आहे.

याबाबत ४३ वर्षाच्या ठेकेदाराने तक्रार केली आहे. तक्रारदार हे झाडे तोडणारे ठेकेदार आहेत. त्यांनी कुरुळी ते वडगाव रासई दरम्यानचा झाडे तोडण्याचा ठेका घेतला आहे. ठेका घेतलेली झाडे तोडून तिची टेम्पोने वाहतूक करीत असताना प्रविण क्षीरसागर याने टेम्पो ताब्यात घेतला होता. तक्रारदार यांनी जुन्नर कार्यालयात जाऊन ८ हजार रुपयांचा दंड भरला व ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र लिहून दिले. त्यानंतर ते ११ ऑक्टोबर रोजी शिरुर वन कार्यालयात टेम्पो सोडवून घेण्यासाठी आले होते. प्रविण क्षीरसागर याने टेम्पो साेडण्यासाठी व पुन्हा कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिरुर वन कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना क्षीरसागर याला पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली असून पोलीस निरीक्षक भारत साळुंखे तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCorruptionभ्रष्टाचारBribe Caseलाच प्रकरणforestजंगल