शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना महागाईबाबत काही देणे-घेणे नाही : सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:25 IST

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बुधवारी (दि. ८) बारामती दौऱ्यावर...

बारामती (पुणे) : विरोधकांना महागाईबाबत काही देणे-घेणे नाही म्हणून ते महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहेत. महागाई आहे तर त्याबाबत विधानसभेत विषय मांडता येतो. विधानसभेत योग्य चर्चा घडवता येते, या शब्दात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बुधवारी (दि. ८) बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी येथील कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी विविध प्रकल्पांची व शेती विषयक माहिती घेतली. त्यांच्या समवेत कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारने रडीचा डाव खेळू नये असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, किरीट सोमय्या असो वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा आदित्य ठाकरे असो, कोणावरही असा प्रकार होता कामा नये.  मात्र असे प्रकार करणारे कोण आहेत, हे बघितले पाहिजे. पुण्यात  सोमय्या गेले होते तेव्हा कोणी केला होता रडीचा डाव? आपण जेंव्हा तत्त्वज्ञान सांगतो तेव्हा आपल्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे,अशी अपेक्षा आहे. नाही तर लोक राजकीय नेत्यांना ढोंगी समजतील असे म्हणत त्यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी बारामतीसारखे कृषी प्रदर्शने चंद्रपूर मध्येही आयोजित केले  पाहिजे म्हणून आज मी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र पाहण्यासाठी आलो, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी यांनी दिली.मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने राज्य थांबले नाही...मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्य चालायचे थांबले का. असा प्रति सवाल करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही एक वर्ष झाल्याच नाही. म्हणून काय काम थांबले आहे का...? मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून राज्य अधोगतीकडे चालले आहे. प्रगती थांबली असे नाही अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.. त्याची यादी मी देऊ शकतो असेही मुनगंटीवार म्हणाले...शेतकरी होणार वीज उत्पादक...अनेक राज्यांनी शेतकऱ्यांना मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, पंजाब सरकारने शेतकऱ्यांना जेव्हा मोफत वीज दिली होती त्यानंतर त्या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली. वीज मोफत देण्याऐवजी महाराष्ट्र सरकार सौर ऊजेर्चा वापर केला. तर शेतकऱ्यांना अल्प दरात वीज मिळू शकते. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पन्नास हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामधून शेतकरीच वीज उत्पादक होऊ शकेल असा हा प्रकल्प असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBaramatiबारामती