शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

'वनविभाग झोपला अन् बिबट्या मात्र जागा', भविष्यात पुण्यात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:44 IST

वन्यजीव धोरण कधी होणार, वन्यजीव-मानव संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजना काय करणार ?

श्रीकिशन काळे 

पुणे : बिबट्यांचा अधिवास नसताना ते उसामध्ये आता चांगले स्थिरावले आहेत. उसाची शेती वाढतेय तशी बिबट्यांची संख्याही वाढली आहे. आता तर पुणे शहराकडे बिबट्याने मोर्चा वळवला आहे. अशा वेळी मानव - बिबट संघर्ष अटळ आहे. बिबट्यांच्या संख्येवर आणि हल्ल्यांवर वन विभाग काहीच उपाय करत नाहीत. त्यासाठीचा आराखडाच तयार केलेला नाही. कारण वन विभाग झोपलेला आहे आणि बिबट्या मात्र जागा आहे. 

नैसर्गिक अधिवासातून बिबट्याने कधीच पळ काढून उसाची शेती आता अधिवास केला आहे. एका वेळी तीन - तीन बछडे जन्माला येत असल्याने त्यावर नियंत्रणच नाही. फुरसुंगी परिसरात, दिवे घाटात येणारा बिबट्या आता साडेसतरा नळी म्हणजे खूप दाट वस्ती असलेल्या भागात शिरकाव करत आहे. आताच योग्य धोरण ठरवले नाही, तर भविष्यात शहरात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार आहे. माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोळकर म्हणाले, गेली अनेक वर्षे झाली, वन्यजीव धोरणाची मागणी केली जात आहे. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. सध्या बिबट्यांचा वावर सोलापूर, बार्शी, बीड, उस्मानाबाद परिसरातही होत आहे. कारण उसाची शेती वाढली आणि त्यात बिबट्यांची संख्याही वाढत आहे. हे रोखायचे असेल तर ठोस धोरण हवे.''

गावांभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक 

''शहराभोवती लोकं कचरा टाकतात. त्याने कुत्री, डुक्करं वाढतात आणि याकडे बिबटे आकर्षित होतात. म्हणून ते शहरालगतच्या परिसरात शिरकाव करत आहेत. गावांभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा बिबट्यांचे हल्ले वाढतच जातील. बिबटे नैसर्गिक अधिवास सोडून इतर ठिकाणी दिसले तर काय करायचे याचे धोरण नक्की हवे. अधिवासात नसतील तर तिथे त्यांना मारायचे की, पकडायचे यावर ठोस निर्णय व्हायला हवा असे माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोळकर यांनी सांगितले.'' 

बिबटे नसबंदीचे झाले काय?

काही वर्षांपुर्वी बिबट्यांची नसबंदी करण्याची घोषणा मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी केली होती. परंतु त्यानंतर यावर काहीच घडामोड झाली नाही. केवळ तात्पुरती घोषणा करून वन विभाग गप्प बसले आहे. वन विभागाकडून बिबट-मानव संघर्षावर ठोस काही तरी काम व्हायला हवे. अन्यथा आज नागरिकांचा हात जखमी झाला आहे, उद्या जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल ? 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागPoliceपोलिस