शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौकातल्या रखडलेल्या उड्डाणपुलासाठी सक्तीने भूसंपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 12:54 IST

चांदणी चौक येथील दोन मजली उड्डाण पुलाचे काम भुसंपादन होत नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते.

ठळक मुद्देमहापालिकेचे जिल्हाधिका-यांना पत्रउड्डाणपुलासाठी १३.९२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन व ६७ सदनिका आणि दोन बंगले ताब्यात घेण्यात येणार राज्य शासनाने पुणे महापालिकेला केली तब्बल १८५ कोटी रुपयांचे अर्थिक मदत जाहीर आतापर्यंत सुमारे ९८ टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण

पुणे: शहरातील बहुप्रतिक्षित चांदणी चौक उड्डाणपुलाचे काम केवळ दीड टक्का म्हणजे एक हेक्टर भूसंपादनाअभावी रखडले आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने संबंधित जागा मालकांसोबत सर्व प्रकारच्या तोडजोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु त्यानंतर देखील केवळ प्रशासनाची अडवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अखेर प्रशासनाने शिल्लक एक हेक्टर जागेचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भातील लेखी पत्र जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे.     चांदणी चौक येथील दोन मजली उड्डाण पुलाचे काम भुसंपादन होत नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. भूसंपादन वेळेत करून घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने महालिकेकडे केल्यानंतर या पुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सप्टेंबर २०१७ मध्ये करण्यात आले. परंतु, त्यानंतर देखील एक-दीड वर्षे भूसंपादना अभावी काम सुरु करण्यामध्ये अडचणी येत होत्या. या उड्डाणपुलासाठी १३.९२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन व ६७ सदनिका आणि दोन बंगले ताब्यात घेण्यात येणार होते. या जागेच्या भूसंपादनासाठी आवश्यक निधी महापालिकेकडे नसल्याने भूमिपूजन होऊनही काम सुरु होऊ शकले नाही. त्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी थेट याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. त्यानंतर राज्य शासनाने विशेष बाब म्हणून पुणे महापालिकेला तब्बल १८५ कोटी रुपयांचे अर्थिक मदत जाहीर केली.     शासनाने अर्थिक मदत दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वतंत्र समिती नियुक्ती करुन अधिकचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करुन युध्दपातळीवर भूसंपादन सुरु केले. यामध्ये प्रशासनाला यश देखील आले असून, आतापर्यंत सुमारे ९८ टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले. परंतु यामध्ये केळळ एक हेक्टर जागा ताब्यात मिळत नसल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली होती. याबाबत प्रशासनाने सर्व पातळीवर संबंधित जागा मालकांसोबत चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील काही मार्ग न निघाल्याने अखेर यासाठी सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिका-यांना लेखी पत्र देण्यात आले असून, येत्या आठ-दहा दिवसांत शंभर टक्के भूसंपादन पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.----------------------एक हेक्टरसाठी प्रकल्पाची अडवणूकचांदणी चौक, कोथरुड, वाजरे, बाणेर या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चांदणी चौक येथे दोन मजली उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी गेल्या आठ-दहा महिन्यांपासून प्रशासनाने युध्दपातळीवर काम केले. यामध्ये प्रशासनाला यश देखील आले. परंतु केवळ दीड टक्का म्हणजे एक हेक्टर जागेचे भूसंपादन होत नसल्याने प्रकल्पाच्या कामामध्ये अडचण येत होती. अखेर हे शिल्लक एक हेक्टर क्षेत्र सक्तीने संपादीत करण्याचा निर्णय घेतला आहे.- सौरभ राव, आयुक्त 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरी