शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

दादा, आता तुम्ही मागे फिरु नका, अपक्ष लढा : नाराज गायकवाडांना समर्थकांचा आग्रह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 12:29 IST

तिकीट मिळेल या अपेक्षेने प्रवीण गायकवाड यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. दिल्लीमधे काही दिवस मुक्कामी राहून त्यानी उमेदवारी साठी प्रयत्न केले. सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षाने चाळीस वर्ष एकनिष्ठ असलेल्या मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली

ठळक मुद्दे'आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातुन नाही तर लाल महालमधून चालणार' असा संदेशआज किंवा उद्या कार्यकर्त्यांची बैठक घेउन याबाबत निर्णय ण बाहेरचा उमेदवार म्हणून स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी केला विरोध

पुणे :काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे जल्लोषात केलेला कांग्रेस प्रवेश,  पुण्यातील लाल महाल येथे घेतलेली समविचारी पक्षांची बैठक, रविवारी काँग्रेसच्या पदयात्रेतील त्यांचा उत्साह हे वातावरण पाहता काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांसह, शेतकरी कामगार पक्ष, आदी संघटनांची प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी मिळणार अशी स्वतःच्या मनाची पक्की धारणा केली होती. पण सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षाने चाळीस वर्ष एकनिष्ठ असलेल्या मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. या निर्णयाने शेतकरी कामगार पक्षातून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड नाराज असल्याचे समजते. त्यांच्या समर्थकानी 'दादा, तुम्ही आता मागे फिरू नका, अपक्ष लढाच' असा आग्रह सुरु केला आहे. त्यामुले आता त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकीट मिळेल या अपेक्षेने गायकवाड यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. दिल्लीमधे काही दिवस मुक्कामी राहून त्यानी उमेदवारी साठी प्रयत्न केले. पण बाहेरचा उमेदवार म्हणून स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. यामध्ये उमेदवारी मिळालेले मोहन जोशी, महापलिकेतील गटनेते अरविंद शिंदे व प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांचा समावेश होता. त्यामुळे गायकवाड याना आधी कांग्रेसमधे प्रवेश करा, मग तिकिटाचे बघू, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी शनिवारी शेकडो कार्यकर्त्यासह मुंबईत पक्षप्रवेश केला. त्यादिवशी ते सायंकाळपर्यंत मुंबईतच थांबून होते. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा होती. दुसया दिवशी त्यानी लाल महाल येथे समविचारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. 'आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातुन नाही तर लाल महालमधून चालणार' असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास त्यांचा बोलण्यातुन दिसत होता. त्यानंतर ते कार्यकर्त्यासह कांग्रेसच्या पदयात्रेतही सहभागी झाले. पण, जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने गायकवाड नाराज झाल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. रात्रीपासूनच कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. त्याना अपक्ष लढण्यासाठी आग्रह केला जात आहे. पण, याबाबत तड़काफड़की निर्णय घेणार नसल्याचे निकटवर्तियांकडून सांगण्यात आले आहे.  आज किंवा उद्या कार्यकर्त्यांची बैठक घेउन याबाबत निर्णय घेतील अशी चर्चा आहे. दरम्यान, याबाबत गायकवाड यांनी मोबाइल बंद करून ठेवल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.-------+++काँग्रेसमधे प्रवेश करण्याच्या एक दिवस आधी गायकवाड यानी युवक काँग्रेसच्या बैठकीत आपण उमेदवारीसाठी आग्रही नसल्याचे जाहीर केले होते. उमेदवारी नाही मिळाली तरी काँग्रेसचे काम करणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले होते. त्यामुळे या भुमिकेवर ते ठाम राहणार की अन्य मार्ग निवडणार याची उत्सुकता आहे.-------

टॅग्स :Puneपुणेpravin gaikwadप्रवीण गायकवाडcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक