शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: साडेचार वर्षे या सरकारला लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही का? शरद पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:43 IST

लोकसभेत लोकांनी धडा शिकवल्यानंतर त्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली तरी उद्याच्या निवडणुकीत मतदार तीच भूमिका घेतील

बारामती : निवडणूकीला उभा राहणारा प्रत्येकजण मी निवडून येणार असे म्हणत असतो. साडेचार वर्ष या सरकारकडे सत्ता असताना त्यांना बहिणीची आठवण झाली नाही, लोकसभा निवडणूकीनंतर ही आठवण आली आहे. कारण लोकांनी धडा शिकवला आहे, उद्याच्या निवडणूकीतही लोक तिच भूमिका निश्चितपणे घेतील, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी लाडकी बहिण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला.

बारामतीतयुगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी युगेंद्र पवार उपस्थित होते. लाडकी बहिण योजनेमुळे महायुती सत्तेवर येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना ते बोलत होते.

राज्यात काही मतदारसंघात मविआच्या दोन घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ज्या जागांवर काही अडचण असेल तेथे दोन्ही पक्षांना फॉर्म भरुन ठेवायला सांगितले आहे. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवकाश आहे. आघाडीत अशी चर्चा करण्याची आवश्यकता असते, बहुसंख्य ठिकाणी एकमत आहे, काही ठिकाणी अडचणी आहे त्यातून आम्ही निश्चित मार्ग काढु, कोण किती जागा लढवेल हे मला माहित नाही. आमचे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष ते काम पाहतात. उरलेली यादी ते आज जाहीर करतील,असे पवार म्हणाले.  युगेंद्र पवार या एका अत्यंत उच्चशिक्षीत युवकास महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही बारामती विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. ते उच्चशिक्षित पदवीधर आहेत. परदेशात त्यांचे शिक्षण झाले आहे. प्रशासन, व्यवसायातील त्यांना माहिती आहे. विशेषतः साखर धंदा, ऊसाचे पिक यातील ते जाणकार आहेत. त्यांना बारामतीची जनता नव्या पिढीतील नव्या नेतृत्वाचा स्वीकार करुन त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करतील. मी ५७ वर्षापूर्वी बारामतीच्या तहसिल कार्यालयात स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो होतो, त्या नंतर आजपर्यंत बारामतीच्या जनतेने मला निवडून दिले आहे. सलग ५७ वर्ष एखाद्या व्यक्तीला सतत निवडून देण्याचे कारण जनतेशी बांधिलकी हे होते. नव्या उमेदवारांना माझे हेच सांगणे आहे की जनतेशी कायम बांधिलकी ठेवा, जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहा, हाच माझा युगेंद्र पवार यांना  सल्ला असल्याचे पवार म्हणाले.      विधानसभेला काय घडेल यावर बोलताना पवार म्हणाले, बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तितकी फार क्वचित मर्यादीत लोकांना असू शकेल, माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे, आजपर्यंतच्या सर्व निवडणूकात बारामतीकरांनी मला निवडून दिले आहे.सुरवातीला निवडणूकांसाठी मला बारामतीत राहावे लागायचे, नंतर बारामतीकरांनीच माझी जबाबदारी घेतली होती, आजही माझा बारामतीकरांवर विश्वास आहे, युगेंद्र पवार यांनाच बारामतीकर मोठ्या मताधिक्याने विजयी करतील,असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारbaramati-acबारामतीyugendra pawarयुगेंद्र पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी