मुंढव्यात आघाडीच्या उमेदवारांची पदयात्रा
By Admin | Updated: February 15, 2017 02:37 IST2017-02-15T02:37:37+5:302017-02-15T02:37:37+5:30
प्रभाग क्र. २२ (मुंढवा-मगरपट्टा-पंधरा नंबर) मधील शाहूनगर, हडपसर रेल्वे स्टेशन, जाधव वस्ती, सरोदे कॉलनी, गवळी आळी

मुंढव्यात आघाडीच्या उमेदवारांची पदयात्रा
हडपसर : प्रभाग क्र. २२ (मुंढवा-मगरपट्टा-पंधरा नंबर) मधील शाहूनगर, हडपसर रेल्वे स्टेशन, जाधव वस्ती, सरोदे कॉलनी, गवळी आळी, आनंद निवास मुंढवा गावठाण या भागात आज राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी पदयात्रा काढली.
याप्रसंगी प्रभाग क्र. २२ चे उमेदवार नगरसेवक चेतन तुपे, माजी महापौर चंचला कोद्रे, हेमलता नीलेश मगर, माजी उपमहापौर बंडू ऊर्फ सुनील गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. लक्ष्मीनगर, शिंदेवस्ती, जहाँगीरनगर, दत्त चौक गवळी आळी, आनंद निवास, कोद्रेवस्ती, कोद्रेनगर, झगडेवस्ती, सर्वोदय कॉलनी, धायरकरवस्ती, श्रीकृष्ण सोसायटी या भागात पाण्याच्या लाईन टाकून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. त्याचप्रमाणे बिडकरवस्ती, पासपोर्ट कार्यालय, सर्वोदय कॉलनी, हडपसर औद्योगिक वसाहत, जहांगीरनगर, मिरेकरवस्ती, भोईराज सोसायटी, गवळी आळी या परिसरात शौचालाये बांधण्यात आली. प्रभागातील विकासकामे मोठ्या प्रमाणात झाल्याने विजयश्री राष्ट्रवादीच्या उमेदवारच खेचून आणतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
पदयात्रेदरम्यान मतदारांनी मोठ्या उत्साहात उमेदवारांचे स्वागत केले. प्रभागातील विकासकामांच्या जोरावर नक्कीच राष्ट्रवादीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.