देहविक्रय करणाऱ्यांना अन्नधान्य, औषधांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:09 IST2021-04-22T04:09:42+5:302021-04-22T04:09:42+5:30
पुणे : दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुणे व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उद्योजक दानेश शहा परिवार ...

देहविक्रय करणाऱ्यांना अन्नधान्य, औषधांची मदत
पुणे : दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, पुणे व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उद्योजक दानेश शहा परिवार यांच्यावतीने बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिला तसेच अन्य गरजूंना अन्नधान्य, औषधांचे वाटप करण्यात आले.
अन्नसुरक्षा विमा योजनेअंतर्गत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबवत आहे. फूड पॅकेट्स, रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषधे, मास्क याचे वाटप करण्यात येते.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, रघुनाथ येमुल गुरुजी यासाठी सहकार्य करतात. बुधवार पेठेतील कार्यक्रमास गुन्हे शाखेच्या अपर पोलीस अधीक्षक वैशाली माने, पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्काई) पुणेचे प्रमुख रघुनाथ येमूल, उद्योजक दानेश शहा, कृपा शहा, अवनी फाउंडेशनच्या प्रा. डाॅ. निवेदिता एकबोटे उपस्थित होते.