मल्हार प्रतिष्ठानकडून दीड वर्षांपासून अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:36+5:302021-06-09T04:13:36+5:30
बेघर लोकांवर अंत्यसंस्कार असो वा अन्य कोणतेही संकट मल्हार प्रतिष्ठान मदतीसाठी कायम तत्पर असते. या प्रतिष्ठान मार्फत मदत करण्यासाठी ...

मल्हार प्रतिष्ठानकडून दीड वर्षांपासून अन्नदान
बेघर लोकांवर अंत्यसंस्कार असो वा अन्य कोणतेही संकट मल्हार प्रतिष्ठान मदतीसाठी कायम तत्पर असते. या प्रतिष्ठान मार्फत मदत करण्यासाठी अनेक अन्नदाते लोक पुढे येऊन प्रतिष्ठान मार्फत अन्नदान करत असतात. नुकतेच उद्योजक सौरभ शेळके व रोहन शेळके (धनगरवाडी) यांच्या वतीने अवसरी कोविड सेंटर, लांडेवाडी कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे प्रत्येक रुग्णांसाठी ग्लुकोज (जम्बो) बिस्कीट पुडे व पाणी बॉटल आज देण्यात आले. तिन्ही कोविड सेंटर मिळून एकूण ४५० ग्लुकोज (जम्बो) बिस्कीट पुडे व ४५० पाणी बॉटल देण्यात आले. तसेच लांडेवाडी कोविड सेंटरसाठी ऑक्सिमीटर देण्यात आले. त्यावेळी मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक कप्पेश बाणखेले, अमोल बाणखेले, विजय थोरात, महेश घोडके, आकाश मोरडे, माऊली लोखंडे, वैद्यकीय अधिकारी भारती, डॉ. काळे, सोनाली निघोट ,डॉ. डांगे, राहुल खेमनर, धादवड, छानवल, पंचशील गाढवे आदी उपस्थित होते.