अन्न-औषध प्रशासनाला आली जाग

By Admin | Updated: June 13, 2015 04:39 IST2015-06-13T04:39:23+5:302015-06-13T04:39:23+5:30

स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून लोकमतने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याची बाब उघडकीस आणली.

Food administration came to wake up | अन्न-औषध प्रशासनाला आली जाग

अन्न-औषध प्रशासनाला आली जाग

पिंपरी : स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून लोकमतने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याची बाब उघडकीस आणली. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे काम करणाऱ्या अन्न निरीक्षकांनी सुरुवातीला दखल घेण्याबाबत अनुत्सुकता दाखवली. कारवाईची मोहीम राबवली जाईल, असे शासकीय उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’ने याप्रकरणी पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे अधिकाऱ्यांना आता कारवाई करणे भाग पडले आहे. कारवाईच्या हालचालींना वेग आला आहे.
बर्फ खाणे अनारोग्यास कारणीभूत ठरणारे असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर बोटावर मोजण्याइतपत संख्येने असलेल्या खाण्याचा बर्फ उत्पादित करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्यात आली. शहरात खाण्याचा बर्फ उत्पादित तयार करणाऱ्या अवघ्या दोन कंपन्या आहेत, तर औद्योगिक बर्फ उत्पादित करणाऱ्या कंपन्यांची संख्या अधिक आहे. संबंधित कंपन्यांची तपासणी करून अहवाल पाठविला आहे. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून त्यांना नोटीस पाठविली जाईल, असे महापालिका हद्दीत काम करणारे अन्न निरीक्षक सांगतात. तपासणी करणे, अहवाल पाठविणे एवढीच कामे आमच्याकडे आहेत. पुढील कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. त्यामुळे संबंधितांना नोटीस पाठविली की नाही, हे आम्ही सांगू शकत नाही, असे अन्न निरीक्षक सांगतात.
औद्योगिक वापराचा बर्फ हाच खाण्याचा बर्फ असा अनेकांचा समज आहे. लिंबू सरबत, उसाचा रस विक्री करणाऱ्यांनासुद्धा खाण्याचा बर्फ वेगळा असतो, याबद्दल माहिती नाही. औद्योगिक वापराच्या बर्फाचा खाद्यपदार्थांमध्ये होणारा वापर रोखण्यासाठी कारवाईचे ठोस पाऊल उचलले गेले पाहिजे. ते उचलले जात नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Food administration came to wake up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.