पारदर्शक निवडणुकीसाठी आचारसंहिता पाळा
By Admin | Updated: February 15, 2017 02:10 IST2017-02-15T02:10:38+5:302017-02-15T02:10:38+5:30
मतदानाचा टक्का वाढविण्याबरोबरच निवडणूक निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने घालून

पारदर्शक निवडणुकीसाठी आचारसंहिता पाळा
पुणे : मतदानाचा टक्का वाढविण्याबरोबरच निवडणूक निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे
पालन करावे. आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करताना सर्वांना समान न्याय, संधी आणि कायद्याचा वापर करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक अरुण डोंगरे यांनी दिल्या.
येथील प्रशासकीय भवनात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नेमलेल्या तालुक्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, विविध पथकांच्या प्रमुखांच्या कामाचा आढावा मुख्य निवडणूक निरीक्षक डोंगरे यांनी घेतला. या वेळी ते बोलत होते.
अरुण डोंगरे म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या यशस्वितेसाठी समन्वयाची अत्यंत अवश्यकता असते. सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करताना दिलेल्या जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडाव्यात.’’ निवडणुकांमध्ये मतदानासाठी नेमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्यरीत्या सर्व टप्प्यावरील प्रशिक्षण देण्याची दक्षता घ्यावी. मतदारजागृतीवर सर्व अधिकाऱ्यांनी भर द्यावा. नवमतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत.(प्रतिनिधी)