ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:09+5:302021-01-08T04:32:09+5:30
खेड तालुक्यात ९० ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकीय हेवेदावे तसेच गावागावातील असणाऱ्या राजकीय गट-तट यांच्यातील असणारी धुसफूस निवडणुकीवेळी ...

ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे पालन करा
खेड तालुक्यात ९० ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकीय हेवेदावे तसेच गावागावातील असणाऱ्या राजकीय गट-तट यांच्यातील असणारी धुसफूस निवडणुकीवेळी दिसून येते. त्यासंदर्भात खेड पोलीस स्टेशनतर्फे प्रत्येक गावात जाऊन येथे सर्वपक्षीय ग्रामपंचायत निवडणूक बैठक आयोजित करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस हवालदार संतोष मोरे, गोपनिय विभागाचे संदीप भापकर, बाळकृष्ण साबळे, अमोल चासकर, अमोल वडेकर यांनी खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव, कनेरसर, निमगाव, दावडी, खरपुडी (खुर्द), खरपुडी (बुद्रुक) या निवडणूक असणाऱ्या गावांना भेट देऊन काही सूचना केल्या तसेच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात सर्व पक्षांना विनंतीदेखील केली. तसेच निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
समाज माध्यमांवर एखाद्या उमेदवाराची बदनामी होईल असे कृत्य करू नये. असे निदर्शनास आल्यास संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी रॅली व गर्दी करू नये. मतदानावेळी काही गडबड गोंधळ झाल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आचारसंहितेचे पालन उमेदवार व कार्यकत्यांनी करावे. याबाबत यावेळी काही पदाधिकारी व उमेदवारांनी काही सूचना मांडल्या. मात्र पोलिसांनी त्यांना निवडणुकीचे नियम व अटी यांचे मार्गदर्शन केले. खरपुडी (ता. खेड) येथे बीट अंमलदार संतोष मोरे, अमोल चासकर तसेच गावातील विविध पक्षांचे उमेदवार, अध्यक्ष, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ : खरपुडी खुर्द (ता. खेड) ग्रामपंचायतचे सर्वपक्षीय उमेदवार यांना कायदा व सुव्यवस्था यांचे पालन करावे, अशा सूचना करताना पोलीस हवालदार संतोष मोरे.
उमेदवाराची बदनामी होईल असे कृत्य करू नये, असे निदर्शनास आल्यास संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी रॅली व गर्दी करू नये. मतदानावेळी काही गडबड गोंधळ झाल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आचारसंहितेचे पालन उमेदवार व कार्यकर्त्यांनी करावे. याबाबत यावेळी काही पदाधिकारी व उमेदवारांनी काही सूचना मांडल्या मात्र पोलिसांनी त्यांना निवडणुकीचे नियम व अटी यांचे मार्गदर्शन केले. खरपुडी (ता. खेड) येथे बीट अंमलदार संतोष मोरे, अमोल चासकर तसेच गावातील विविध पक्षांचे उमेदवार, अध्यक्ष, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ: खरपुडी खुर्द (ता खेड ) ग्राम पंचायतचे सर्वपक्षीय उमेदवार यांना कायदा व सुव्यवस्था यांचे पालन करावे अशा सुचना करताना पोलिस हवालदार संतोष मोरे.