गौतम बुद्धांच्या अष्टांगमार्ग तत्त्वांचे अनुसरण करावे : संजय भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:10 IST2021-05-27T04:10:21+5:302021-05-27T04:10:21+5:30
कोरोनाच्या सावटाखाली कोविड नियमांचे पालन करून बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी ...

गौतम बुद्धांच्या अष्टांगमार्ग तत्त्वांचे अनुसरण करावे : संजय भोसले
कोरोनाच्या सावटाखाली कोविड नियमांचे पालन करून बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी भगवान गौतम बुद्ध व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते किरण खोमणे व प्रवीण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विजय भोसले यांनी पूजापाठ व धम्मवंदना घेतली.
या वेळी भगवान भोसले, विशाल घोडके, राजाभाऊ भोसले, संदीप आढाव, राजू शेख, दादा सोनवणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विश्वास भोसले, नेहाल भोसले, मयूर भोसले,चेतन भोसले, पप्पू भोसले यांनी केले. दरम्यान, रमामातानगर येथे बुध्द जयंती साजरी करुन उपस्थितांना खीरवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अण्णा घोडके, संजय वाघमारे, अमोल भोसले, बाबा घोडके, सतीश जगताप, मुन्ना शिंदे, संजय गायकवाड यांनी केले.
माळेगाव येथील बुद्ध विहारात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.
२६०५२०२१-बारामती-०३