शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावरील माल वाहतूक वाढविण्यावर भर देणार : खासदार गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 19:58 IST

संरक्षण दलाची सुमारे अडीच एकर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देविमानतळ सल्लागार समितीची वर्षातील पहिली बैठक

पुणे : पुणे विमानतळावर माल वाहतुकीसाठी जागा कमी पडत आहे. संरक्षण दलाची सुमारे अडीच एकर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात ही जागा मिळवून माल वाहतुक वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली. भविष्यात कोरोनाची लस पुणे विमानतळावरून जायला हवी, या दृष्टीने प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले.

विमानतळ सल्लागार समितीची या वर्षातील पहिली बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीला खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनिल टिंगरे, विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांच्यासह महापालिका, पोलिस, पीएमपी, उद्योग आदी क्षेत्रातील समिती सदस्य उपस्थित होते. समितीमध्ये मराठा चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता, एअर मार्शल (निवृत्त) भुषण गोखले, अभिजित पवार, बादशाहा सय्यद व उज्ज्वल केसकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

बापट यांनी बैठकीमध्ये झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, कार्गोसाठी अडीच एकर हवी आहे. जागा हस्तांतरणात काही अडचणी आहेत. संरक्षण दलाशी याबाबत चर्चा झाली आहे. जागेअभावी माल वाहतुक होत नसल्याने उद्योजकाना आपला माल मुंबईला पाठवाला लागतो. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे यांदर्भात लवकर संरक्षण मंत्र्यांना भेटणार आहोत. तसेच सिग्नल फ्री कॉरीडॉरवरही चर्चा झाली. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण, सिग्नल, चौक अशा अडचणी आहेत. रस्ते रुंदीकरण, पार्किंग, नवीन टर्मिनल इमारतीवरही चर्चा करण्यात आली. ---------------दररोज सुमारे ९ हजार प्रवासीसध्या दररोज ९ हजार प्रवासी ये-जा करत आहेत. २०१८-१९ मध्ये ही संख्या वर्षाला ९० लाख एवढी होती. त्यानंतर त्यामध्ये मागील वर्षी ८० लाखापर्यंत घट झाली. कोरोना संकटामुळे विमान उड्डाणाला मर्यादा असल्याने जवळपास दररोज ९० विमानांचीच ये-जा होत आहे. पुर्वी हा आकडा १८० च्या जवळपास होता. ------------

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळgirish bapatगिरीष बापट