नागरी सुविधा केंद्रांत भरारी पथके
By Admin | Updated: February 25, 2015 00:43 IST2015-02-25T00:43:40+5:302015-02-25T00:43:40+5:30
नागरी सुविधा केंद्रांच्या परिसरात पोलिसांचे भरारी पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

नागरी सुविधा केंद्रांत भरारी पथके
पुणे : नागरी सुविधा केंद्रांच्या परिसरात पोलिसांचे भरारी पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. दहावी-बारावीची परीक्षा संपल्यानंतर विविध दाखले काढण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांत नागरिकांची प्रचंड गर्दी होते. त्यात अशा प्रकारे एजंटांकडून नागरिकांना त्रास होत असल्याच संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई
करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.
शिवाजीनगर शासकीय गोदाम येथील नागरी सुविधा केंद्रात एजंटांकडून नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’ ‘लोकमत’ने केले होते. यांची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील एका नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याने सुविधा केंद्राची पाहणी केली असता, त्यांनादेखील एजंटांकडून हाच अनुभव आला. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.