श्री गणेश जयंती निमित्त श्री महागणपती मंदिराला फुलांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST2021-02-16T04:12:06+5:302021-02-16T04:12:06+5:30

श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ४ वा.अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने गणेश ...

Flowers to Shri Mahaganapati Mandir on the occasion of Shri Ganesh Jayanti | श्री गणेश जयंती निमित्त श्री महागणपती मंदिराला फुलांची

श्री गणेश जयंती निमित्त श्री महागणपती मंदिराला फुलांची

श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ४ वा.अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने गणेश जयंती निमित्त गणेश याग करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा.नारायण पांचुदकर यांनी सांगितले.

देवस्थानच्या वतीने श्रींचे समोर दुपारी १२ व सायं ६ वा. सहस्रावर्तने, महापूजा व महानैवेद्य करण्यात आल्याचे विश्वस्त अॅड. विजयराज दरेकर व शेखर देव यांनी सांगितले. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने अर्पण केलेल्या फुलांची मंदिर व परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली. या वेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, शेखर देव, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही

श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करत असताना गणेशजन्म उत्सव आयोजित केला आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशजन्म सोहळा साधेपणाने व मर्यादित लोकांचे उपस्थितीमध्ये साजरा होत आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Flowers to Shri Mahaganapati Mandir on the occasion of Shri Ganesh Jayanti