शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

फ्लाॅवर, मटार, गवार, पडवळ, काकडीच्या दरात वाढ, दर सामान्य माणसाच्या आवाक्यात असावेत - गृहिणींचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 18:00 IST

उन्हाचा चटका वाढल्याने उत्पादनात घट झाल्याचा परिणाम

ठळक मुद्देउन्हाळ्यात ज्या भाज्या आहारात वापरल्या जातात त्यांचे वाढले दर

उन्हाचा चटका वाढल्याने पिंपरी भाजी मंडईत भाज्यांचे उत्पादन कमी होऊन काही भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यात फ्लाॅवर, मटार, गवार, पडवळ, काकडीच्या दरात वाढ झाली आहे. त्यावर हे दर सामान्यांच्या आवाक्यात असावेत. असे मत गृहिणींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. 

या आठवड्यात फ्लाॅवर, मटार, गवार तसेच पडवळ यांची आवक कमी झाली आहे. तसेच उन्हामुळे काकडीला मागणी वाढली आहे. परिणामी त्यांच्या दरात वाढ झाली आहे. मावळ तालुक्यातून काळ्या वांग्यांची आवक वाढली आहे. त्यात महिको वाग्यांचीही चांगली आवक आहे. त्यामुळे वांग्यांच्या दरात काहिसी घसरण झाली असून, वांगी सामान्यांच्या आवाक्यात आली आहेत. 

पालेभाज्यांमध्ये मुळा व कांदापात प्रतिगड्डी १५ रुपये दर आहे. तर इतर सर्व भाज्या १० रुपये प्रतिगड्डी आहेत. सरसो (मोहरी), चंदनबटवा या उत्तरभारतीय भाज्यांना उन्हाळ्यामुळे मागणी नाही. तसेच त्यांचे उत्पादनही कमी झाले आहे. त्याचप्रमाणे लातूर येथील तुरीच्या शेंगांची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. शितपेयांमध्ये वापर होत असल्याने लिंबूला मागणी वाढली आहे. प्रतिशेकडा २५० ते ३०० रुपये दर लिंबूला मिळत आहे. 

उन्हाळ्यात ज्या भाज्या आहारात वापरल्या जातात त्यांचे दर वाढले आहेत. ते दर आवाक्यात आले पाहिजेत. काकडी, बिट, लिंबूचेही दर कमी झाले पाहिजे. कोरोना महामारीमुळे सकस आहारावर भर देण्यात येत आहे.- संगीता शिंदे, गृहिणी

ग्राहक घराजवळूनच भाजीपाला खरेदी करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे मंडईत अपेक्षित गर्दी होत नाही. किरकोळ विक्रीला याचा फटका बसत आहे. कोरोनामुळे ही परिस्थिती ओढावत असून, भाजीपाल्याचे दर वाढू शकतात.- गणेश दाैंडकर, विक्रेता, पिंपरी 

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) :बटाटे: २० ते २५, कांदे: ३० ते ३५, टोमॅटो: १० ते १२, गवार: ९० ते १००, सुरती गवार: ८०, दोडका: ५० ते ६०, घोसाळी: ५० ते ६०, लसूण: ८० ते १००, आले: ४०, भेंडी: ४० ते ५०, वांगी: २० ते ३०, काळी वांगी: २० ते २५, कोबी: १० ते १२, शेवगा: ४० ते ५०, काळी मिरची: ६०, हिरवी मिरची: ५०, शिमला मिरची: ५०, पडवळ: ६० ते ७०, दुधी भोपळा: ३० ते ३५, लाल भोपळा: २०, काकडी: ४०, चवळी: ५० ते ६०, काळा घेवडा: ६०, तोंडली: ४०, गाजर: ३०, वाल: ५० ते ६०, राजमा: ८०, मटार (वटाणा): ६०, कारली: ४०, पावटा: ६०, श्रावणी घेवडा: ४० ते ५०, बिट: ३०, फ्लॉवर: ४०, तुरीच्या शेंगा: ६०, कैरी (तोतापुरी): ६० ते ७०, कैरी (कर्नाटक): ८०, लिंबू (शेकडा): २५०.

पालेभाज्यांचे भाव (प्रति गड्डी) :कोथिंबीर: १०, मेथी: १०, शेपू: १०, पालक: १०, मुळा: १५, तांदुळजा: १०, करडई: १०, आंबटचुका: १०, चवळी: १०, हिरवा माठ: १०, राजगीरा: १०, पुदिना: ५, आंबाडी: १०, कांदापात: १५, हरबरा: १०, गवती चहा: ८ ते १०, लालबिट: १०.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडvegetableभाज्या