महागणपतीला फुलांची सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST2021-07-28T04:10:38+5:302021-07-28T04:10:38+5:30

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वाजता अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने ...

Flower decoration to Mahaganapati | महागणपतीला फुलांची सजावट

महागणपतीला फुलांची सजावट

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वाजता अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली.

देवस्थानच्या वतीने श्रीं चे समोर दुपारी १२ वा. महापुजा व महानैवेद्य करण्यात आला.

अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून उद्योजक संतोष गवारे यांच्याकडून १०१ डझन केळींचा नैवेद्य श्री महागणपतीला दाखविण्यात आला. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने अर्पण केलेल्या फुलांची मंदिर व परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून "श्रीं" ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, डॅा. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर ,ॲड.विजयराज दरेकर,व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : २७रांजणगाव गणपती फुलांची सजावट

फोटो:अंगारकी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीला उद्योजक संतोष गवारे यांचेकडून केळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

270721\27pun_1_27072021_6.jpg

फोटो:अंगारकी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीला उद्योजक संतोष गवारे यांचेकडून केळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

Web Title: Flower decoration to Mahaganapati