शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Pune Municipal Corporation: पुण्यात पूरपरिस्थिती! महापालिकेचे अधिकारी बसूनच, नियुक्ती होऊनही कामाचा विभाग ठरेना

By राजू हिंगे | Updated: July 30, 2024 14:47 IST

पुणे महापालिकेमध्ये रिक्त असलेल्या पदावर राज्यसरकारकडुन चार उपायुक्त आले आहेत, मात्र त्यांच्या कामाचा विभाग अजून ठरला नाही

पुणे :  पुणे महापालिकेमधील अतिरिक्त आयुक्त पदाच्या दोन जागा रिक्त आहे. त्यामुळे एकाच अतिरिक्त आयुक्तावर प्रशासकीय कारभाराचा ताण आला आहे. त्यातच  पुणे महापालिकेमध्ये रिक्त असलेल्या पदावर  राज्यसरकारकडुन चार उपायुक्त आले आहेत. पण या उपायुक्ताची नियुक्ती होउन सात दिवसाचा कालावधी झाला आहे. पालिकेतील क्रिम खाते मिळावे यासाठी हे उपायुक्त लॉबिंग करत आहेत.  त्यामुळे या पण या चार उपायुक्तांच्या कामाचा विभाग अदयापही ठरलेला नाही.             पुणे महापालिकेचे तत्कॉलीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, रविंद्र बिनवडे यांची बदली झाली. त्यामुळे अतिरक्त आयुक्त पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे.  पुणे महापालिकेत उपायुक्त पदाच्या एकुण १८ जागा आहेत. त्यातील ९ उपायुक्त पालिकेतुन आणि ९ उपायुक्ताची पदे राज्यसरकारकडुन प्रतिनियुक्तीने भरली जातात.  त्यातील राज्यसरकारकडील उपायुक्तपदाची  पाच पदे रिक्त आहेत.  त्यामुळे  एकाच विभागच्या उपायुक्ताकडे अन्य दाेन ते तीन विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच राज्यसरकारने  आशा राउत, चेतना केरूरे यांची १९ जुलै रोजी तर सुनिल बल्लाळ, प्रशांत ठोंबरे  यांची २४ जुलै रोजी  नियुक्ती करण्याचे आदेश राज्यसरकारने काढले आहेत. त्यामुळे पालिकेला चार उपायुक्त मिळाले आहेत. मात्र पालिकेतील क्रिम खात्यासाठी या चार उपायुक्त लांबिग करत आहेत.  त्यासाठी पालिकेतील अतिवरिष्ठ अधिका०यावर वेगवेगळया मार्गाने दबाव आणला जात आहे. त्यामुळे नियुक्ती होउनही या चार उपायुक्तांचा कामाचा विभाग ठरलेला नाही. 

संजय शिंदेची बदली केली पण अन्य  ठिकाणी नियुक्ती नाही 

खडकवासला धरणातुन पाणी सोडल्यानंतर  शहरात नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) येथील एकतानगर परिसरात पूर आल्यानंतर निर्माण झालेली स्थिती आणि अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी उपायुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आली. पण त्यांनाही अदयाप कामाचा विभाग ठरलेला नाही.  

पुर स्थिती असताना अधिकारी बसुन शहरात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर एकता नगर, संगमवाडी, येरवडा, बाणेर , बालेवाडी या भागात पाणी शिरले. त्यामुळे संबंधित भागातील उपायुक्तावर कामाचा ताण पडला होता.  मात्र या स्थितीतही राज्यसरकारकडुन आलेले चार उपायुक्त दर्जाचे अधिकारी बसुन होते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तfloodपूरWaterपाणीRainपाऊस