शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

मुळशीत रस्त्यांची चाळण; पावसात चालणेही झाले कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:20 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी नाराजी

पौड : सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुळशी तालुक्यातील सर्वच मार्र्गांवर रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. परिणामी वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत सामान्य नागरिक, पक्ष, संघटना यांनी लेखी व तोंडी स्वरूपात अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. मात्र रस्ते बांधकाम व दुरुस्ती विभागाकडून केवळ त्यांना केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.चांदणी चौक ते पिरंगुट, पौड, मुळशी रस्ता, हिंजवडी-माण-घोटावडे फाटा रस्ता, पाषाण-सुस-नांदे व लवळे फाटा या मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. तालुक्यातील अन्य गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे. भर पावसात या रस्त्यावरून चालताना व दुचाकी चालवताना आपण केव्हा खड्ड्यात घसरून पडू या भीतीने नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पिरंगुट ते भूगाव दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे शाळकरी मुले, कंपनीचे कामगार यांचा बराच वेळ प्रवासातच जातो. रस्त्याच्या या स्थितीबाबत तालुक्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून मोठ्या प्रमाणात चर्चा, विनोद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत नुकतेच एक निवेदन देण्यात आले आहे. लवकरात लवकर रस्त्यातील खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे मुळशी तालुकाप्रमुख संतोष मोहोळ यांनी दिली.खड्ड्यांवरून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर होणारी चर्चासर्व मुळशीकरांसाठी आनंदाची बातमी....सबंध मुळशी तालुक्यातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या सर्व रस्त्यांना ‘शॉक अ‍ॅबसॉर्बर चाचणी रस्ता’ म्हणून जागतिक मानांकन मिळाले आहे. यामुळे या पावसात आपल्या वाहनाची चाचणी करून घेण्यासाठी मोठी झुंबड या रस्त्यावर उतरत आहे. त्यातल्या त्यात रामनदी ते माताळवाडी, लवळे फाटा ते घोटवडे फाटा, पौड ते आसदे हे मार्ग एकमेकांशी उत्तम खड्ड्यांच्या बाबतीत स्पर्धा करीत आहेत.प्रथमच असे मानांकन मिळाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांची छाती गर्वाने फुलून ५६ इंच एवढी झाली आहे. लवकरच लिम्का आणि गिनीज बुकमध्ये या रस्त्यांची नोंद होणार असल्याने या संस्थेच्या प्रतिनिधीस मीच मुलाखत देणार अशी चढाओढ सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांमध्ये लागताना दिसत आहे.बच्चेकंपनीसुद्धा अ‍ॅडवेंन्चर राईडची सोय इथेच करून दिल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांवर प्रचंड खूष आहे.चला, तर मग तुम्ही अशी राईड आणि चाचणी करून घ्यायला आवर्जून मुळशीत या!

टॅग्स :Potholeखड्डेPuneपुणे