शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या ओपन डे ला ‘फ्लॅश मॉब’चे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 19:27 IST

फि्ल्म अॅऩ्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट मध्ये अाज अाेपन डे निमित्त नागरिकांना एफटीअायअायच्या सफरीबराेबरच फ्लॅशमाॅबचाही अानंद लुटता अाला.

पुणे : पावसाचा सुखद शिडकावा...चहुकडे आल्हाददायी करणारी हिरवाई...पानांवर दवबिंदूची पसरलेली झालर...अशा सृजनशीलतेचा आस्वाद घेत एफटीआयआयच्या ‘मुक्त’ वातावरणात प्रवेश करीत असताना पुणेकरांना अचानक गणेशाचा ठेका ऐकायला येऊ लागला ...ही स्वागत करण्याची आगळीवेगळी पद्धत आहे की काय असे अनेकांना वाटले ..मात्र बघता बघता त्या ठेक्यावर तरूणाईने ताल धरू लागली..न् ‘हम फिट तो इंडिया फिट’ या गाण्यावर महाविद्यालयीन तरूणाईची पावले थिरकायला लागली..’ओपन डे’ च्या दिवशी ’फ्लॅशमॉब’च्या मिळालेल्या या सरप्राईजने पुणेकरांना सुखद धक्का दिला. सर्वांनीच हा क्षण कँमे-यात बंदिस्त केला....तर कुणी मोबाईलवर याचे रेकॉर्डिंग करत होते.. तरूणाईबरोबर आबालवृद्धांनाही बेभान होऊन नृत्य करण्याचा मोह आवरला नाही...या अभिनव उपक्रमामुळे  पुणेकरांना एफटीआयआयची अविस्मरणीय सफर घडली. 

    गेल्या वर्षीपासून फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ही संस्था पुणेकरांना पाहाता यावी यासाठी प्रशासनाकडून‘ओपन डे’ चा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच ‘फ्लॅश मॉब’ आयोजित करण्यात आला. सकाळी 9.30 वाजता ‘ओपन डे’ ला प्रारंभ झाला. दर अर्ध्या अर्ध्या तासाने फ्लॅशमॉब सादर होत होता. काही लहान मुले संस्था बघायला आली होती...त्या ठेक्यावर पाय हलविण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही...संस्थेत उत्साहाचे वातावरण तयार झाले होते..आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी एफटीआयआयतर्फे फिटनेस या संकल्पनेवर ‘हम फिट तो इंडिया फिट’ या गाण्याची निर्मिती नँशनल सव्व्हिस स्कीम या प्रादेशिक संचालनालयाच्या सहकार्याने  करण्यात आली. गीत, संगीताची धुरा विद्यार्थ्यांनीच सांभाळली. लेखन विभागाचा विद्यार्थी संजय सेन सागर याने गीतलेखन आणि अनुराग रोहित आणि शुभम या साऊंड विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणपती ठेक्याचा खुबीने वापर करून शब्दांना संगीतबध्द केले. गायक जसराज जोशीच्या स्वरासाजातून गाण्याला एक वेगळाच बाज आला.  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून एफटीआयआयकडून या फ्लॅशमॉबचे ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला जाणार असल्याची माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयnewsबातम्या