शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगोंचे पिंपळगाव जोगा परिसरात आगमन...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:18 IST

पर्यटकांच्या गर्दीनं जलायश फुलला

खोडद : पक्षी अभ्यासकांना, पर्यटकांना वेड लावणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन पिंपळगाव जोगा जलाशयावर झाले आहे. या पक्ष्यांच्या सहवासाने जलाशयाचा परिसर सौंदर्याने फुलून गेला आहे.परिसरात फ्लेमिंगो जलाशयाच्या परिसरात ठिकठिकाणी थव्या थव्याने राहत आहेत. पर्यटक व पक्षी अभ्यासकांची पावलं या परिसरात वळू लागली आहेत. जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी फ्लेमिंगोंसह इतर विविध प्रकारचे अनेक पक्षी गर्दी करत असतात. माणिकडोह, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगा अशी ५ धरणे या तालुक्यात आहेत. या धरणांच्या पाणलोट परिसरात अनेक पक्षी मोठ्या संख्येने येतात. माळशेज घाटाजवळ असणाºया व किल्ले हरिश्चंद्र गडाकडे जाणाºया वाटेवरील पिंपळगाव जोगा या धरणामध्ये तब्बल ३० वर्षांपासून हे फ्लेमिंगो दरवर्षी नित्यनियमाने येत आहेत.पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक यांनी सांगितले की, जगभरात या पक्ष्याच्या एकूण ६ प्रजाती आढळतात. लेसर फ्लेमिंगो आणि ग्रेटर फ्लेमिंगो या २ प्रजातींपैकीच भारतातील स्थानिक आहे. ज्या आपल्याकडे दरवर्षी आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये दिसतात. भातखाचरं, लहान-मोठी पाण्याची तळी, गोड्या पाण्याचा तलाव, जलाशय, खाड्या, मोठ्या धरणाचा पाणपसारा, मिठागरे, दलदली ही ठिकाणं या पक्ष्यांची अधिवासाची ठिकाणं आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो.मढ येथील निसर्ग अभ्यासक यश मस्करे यांनी सांगितले की, जुन्नरजवळील पिंपळगाव जोग धरणाच्या पाण्यात रोहित पक्षी चक्क भर पावसाळ्यात दिसतात. जूनच्या सुरुवातीला ते येथे येतात. सप्टेंबरपर्यंत ते येथेच दिसतात. फॉरेस्ट रेकॉर्डनुसार १९८१ ते १९८२ पासून त्यांची नोंद आहे.> कच्छच्या रणातही आढळते या पक्ष्यांची वस्तीउष्ण कटिबंधात हा पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे.भारतातपण हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये उथळ पाणी असते अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात. पाणी व ऊन पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते. त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेenvironmentवातावरण