शरद पवार यांच्याकडून झेंडे कुटुंबीयांचे सांत्वन
By Admin | Updated: September 10, 2014 00:22 IST2014-09-10T00:22:21+5:302014-09-10T00:22:21+5:30
सदाशिव अण्णांनी समाजाला, कुटुंबाला, आपल्या भागाला एक प्रकारची दिशा दाखवण्याचे काम आयुष्यभर केले. आज ते आपल्यामध्ये नाहीत

शरद पवार यांच्याकडून झेंडे कुटुंबीयांचे सांत्वन
खळद : सदाशिव अण्णांनी समाजाला, कुटुंबाला, आपल्या भागाला एक प्रकारची दिशा दाखवण्याचे काम आयुष्यभर केले. आज ते आपल्यामध्ये नाहीत; पण त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या, ज्या भूमिका बजावल्या, यातून समाजासमोर जे आदर्श ठेवले, ते कायम स्मरणात राहतील, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
पवार यांनी दिवे येथे झेंडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचेसांत्वन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी झेंडे यांचे कुटुंबिय पत्नी व्दारकाबाई, हाफकिनचेकार्यकारी संचालक संभाजीराव झेंडे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष उद्योजक विठठ्लआप्पा झेंडे,बाळासाहेब झेंडे,दिलीप झेंडे,ज्ञानेश्वर झेंडे यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादीचेअध्यक्ष जालिंदर कामथे, माजी आ.जगन्नाथ शेवाळे, अशोक टेकवडे,विजय कोलते, सुदामराव इंगळे, प्रा.दिगंबर दुर्गाडे, राहुल शेवाळे, शिवाजी पोमण, माणिकराव झेंडे, बाळासाहेब
कामथे, अनिल टिळेकर, अशोक टिळेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले गेली ५० वर्षेसार्वजनिक जीवनामध्ये आम्ही लोक काम करीत असताना जे काही निष्ठेचे सहकारी सातत्याने पा ठीमागे राहीले त्यांच्यामध्ये आण्णांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. (वार्ताहर)