दौंडमध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:15 IST2021-08-17T04:15:55+5:302021-08-17T04:15:55+5:30

तहसील कार्यालयाच्या परिसरात तहसीलदार संजय पाटील, दौंड नगरपरिषदेत नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी अधिकारी, कर्मचारी ...

Flag salute at various places in Daund | दौंडमध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदन उत्साहात

दौंडमध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदन उत्साहात

तहसील कार्यालयाच्या परिसरात तहसीलदार संजय पाटील, दौंड नगरपरिषदेत नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

या वेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

येथील भीमथडी शिक्षण संस्थेत डॉ. लक्ष्मणराव बिडवे, निर्गुणदत्त मंदिराजवळ लिंगाळी ग्रामपंचायत सदस्य गणेश जगदाळे यांनी ध्वजवंदन केले. याप्रसंगी प्रेमसुख कटारिया, राजेश पाटील उपस्थित होते.

शांताबाई काळुराम ठोंबरे प्राथमिक विद्यालयात मनोहर बोडखे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी हरिभाऊ ठोंबरे, उमेश वीर, दीपक धुमाळ, लक्ष्मण दुधाट, रामभाऊ सिद्धनाथ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.‌ पोदार स्कूलमध्ये राज्य राखीव पोलीस बल गटाचे पोलीस अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी प्राचार्य विशाल जाधव, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. माळवाडी येथील भाऊसाहेब भागवत विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते दिनेश भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Flag salute at various places in Daund