इंदापूरातील प्रभाग एकमध्ये ध्वजारोहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:11 IST2021-04-15T04:11:27+5:302021-04-15T04:11:27+5:30

यावेळी डॉ. अविनाश पाणबुडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहिती सांगून सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी सुधीर मखरे, कांबळे ...

Flag hoisting in Ward One, Indapur | इंदापूरातील प्रभाग एकमध्ये ध्वजारोहन

इंदापूरातील प्रभाग एकमध्ये ध्वजारोहन

यावेळी डॉ. अविनाश पाणबुडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहिती सांगून सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी सुधीर मखरे, कांबळे साहेब, स्वप्निल मखरे, श्रीकांत मखरे, सुमित वाघमारे, सिद्धार्थ मखरे, उमेश मखरे यांनी मास्कचे वाटप करून करोना लसीकरणबाबत जनजागृती केली.

तसेच प्रभाग ८ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील बुद्ध विहार येथे इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता व जंतूनाशक फवारणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते पोपटराव शिंदे, नगरसेवक अमर गाडे, संदिपान कडवळे, नितीन आरडे, अशोक मखरे, अनिल राऊत, अस्लम बागवान, बापू मखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

१४ इंदापूर ध्वजारोहन

इंदापूर शहरातील डॉ. आंबेडकर हौसिंग सोसायटी येथे जयंतीनिमित्त ध्वजारोहन करताना नगरसेवक अनिकेत वाघ व मान्यवर.

Web Title: Flag hoisting in Ward One, Indapur