सव्वाआठशे केंद्रांवर लसीकरण
By Admin | Updated: January 30, 2017 02:55 IST2017-01-30T02:55:17+5:302017-01-30T02:55:17+5:30
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी पिंपरी-चिंचवड शहरातील दोन लाख ३ हजार ६६० बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले.

सव्वाआठशे केंद्रांवर लसीकरण
पिंपरी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी पिंपरी-चिंचवड शहरातील दोन लाख ३ हजार ६६० बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले.
या मोहिमेचे उदघाटन सहआयुक्त दिलीप गावडे, खेलरत्न पुरस्कार विजेती अंजली भागवत यांच्या हस्ते तालेरा रुग्णालयात करण्यात आले. यावेळी वैद्यकीय संचालक पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरात ८२६ लसीकरण केंद्रांवर ही मोहिम राबविण्यात आली. यामध्ये महापालिकेची सर्व रुग्णालये, दवाखाने, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा ७५१ ठिकाणी तर बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी २६ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे होती. यासह वीटभट्या, फिरत्या लोकांची पाले, बांधकाम साईट या ठिकाणच्या बालकांसाठी ४९
फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय
केली होती. यासाठी आठ प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ५३ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २ हजार ४ २७ कर्मचारी नेमण्यात आले होते. (प्रतिनिधी)