खूनप्रकरणी पाच जणांना अटक
By Admin | Updated: May 7, 2015 05:15 IST2015-05-07T05:15:19+5:302015-05-07T05:15:19+5:30
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून रविवारी रात्री निर्घृण खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

खूनप्रकरणी पाच जणांना अटक
पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून रविवारी रात्री निर्घृण खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यातील तिघांना हडपसरजवळील हांडेवाडीतून ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांनी सांगितले.
नितीन दत्तात्रय कसबे (वय २१, रा. आंबिल ओढा वसाहत, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विनायक ऊर्फ काळ्या विलास रणदिवे (रा. कृष्णानगर, महंमदवाडी), सूरज संजय घुटे (रा. १४४, दांडेकर पूल), राहुल ऊर्फ श्रावण अशोक बुरगुले (रा. १३४, दांडेकर पूल), चैतन्य ऊर्फ चैत्या मच्छिंद्र रणदिवे (रा. १३३, आंबिल ओढा सोसायटी, दांडेकर पूल), चंद्रकांत बसप्पा कांबळे (रा. १३३, दांडेकर पूल) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरारी आहेत. अनिल दत्तात्रय कसबे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे.
उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या सूचनांनुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव, सहायक निरीक्षक देशमाने, पोलीस कर्मचारी फुलपगारे, मोहिते, खोमणे, जमदाडे, कुदळे, गवळी यांच्या पथकाने आरोपींंना अटक केली. (प्रतिनिधी)
आंबिल ओढा वसाहतीतील घटना
४नितीन आणि आरोपींचे पूर्वीचे भांडण आहे. या भांडणाच्या रागामधून त्याचा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आंबिल ओढा वसाहतीमध्ये खून करण्यात आला. माजी महापौर माऊली शिरवळकर यांच्या घराशेजारी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. कसबेला एकटे गाठून त्याचा खून करण्यात आला होता.