कारच्या धडकेत पाच जण जखमी
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:18+5:302015-08-28T23:37:18+5:30
कारच्या धडकेत पाच जण जखमी

कारच्या धडकेत पाच जण जखमी
क रच्या धडकेत पाच जण जखमीदोघे गंभीर : सावेनर परिसरातील अपघातसावनेर : भरधाव कारने धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. यातील दोघे गंभीर असून, त्यांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. सर्व जण कामगार आहेत. ही घटना सावनेर एमआयडीसी परिसरात शुक्रवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुरेश चचाने (२२), नितेश सोनवणे (२०), मारोती सोनवणे (४५), रमेश राऊत (५८), अनिल पाटील (३५) सर्व रा. भागीमाहेरी अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व जण सावनेर एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमध्ये काम करतात. ते काम आटोपून भागीमाहेरी येथे घरी जात होते. त्यातच मध्य प्रदेशातील पांढुर्ण्याहून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या एमएच-३५/ई-१७८९ क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धउक दिली. यात पाचही जण जखमी झाले. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी या सर्वांना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. यातील रमेश राऊत आणि मारोती सोनवणे यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला रवाना करण्यात आले. या प्रकरणी केळवद पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)***